लग्नाचा दिवस कोणत्याही वधूसाठी खूप खास असतो. त्यासाठी त्या जवळपास एक महिना आधी तयारी करतात. मग ते प्रत्येक साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग दागिने असो वा चेहऱ्यावरील ग्लो असो. वधू या सर्वगोष्टी आधीपासून करतात. या सगळ्या धावपळीच चेहरा टॅन होतो. कधी कधी सौंदर्य प्रसादने वापरुन त्या चेहऱ्यावर चमक आणण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्याचा असर हा थोडा काळापर्यंत मर्यादीत असतो. त्यामुळे जर तुम्हाला कायम तुमच्या चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर खाली दिलेल्या टीप्ल फॉलो करा...
वधूने चेहऱ्यावर चमक येण्यासाठी दररोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर ब्राइडल चमक मिळवण्यासाठी आणि त्वचा मुलायम ठेवण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक असते. एका आठवड्यात ब्राइडल ग्लो मिळवण्यासाठी पाणी आपल्याला मदत करू शकते.
वाचा: ओट्स खाण्याचे 'हे' आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या ओट्स बनवण्याची रेसीपी
त्वचेवर मेकअप लावल्याने चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढा आणि मग झोपा. मेकअप काढण्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर करा.
वाचा: दही कढी खायला आवडते? मग ‘या’ ३ प्रकारच्या चटपटीत रेसिपी नक्की करा ट्राय!
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी कॅफिन आणि धूम्रपान टाळावे. दिवसातून दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका.
वाचा: उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ ५ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी! काय आहे IRCTCच्या पॅकेजमध्ये खास?
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर आठवड्यातून दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करा. नैसर्गिक गोष्टींनी त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आपण बेसन, हळद, कॉफी किंवा वाळलेल्या संत्र्याची साल वापरू शकता.
वाचा: नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?
५) गुलाबी ज्यूस प्या:
बीटरूट, गाजर, सफरचंद, डाळिंब आणि आवळा घालून ज्यूस बनवा. हा गुलाबी ज्यूस दररोज एक ग्ला प्या. या ज्यूस प्यायल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. लग्नापूर्वी मुलींनी हा ज्यूस तीन ते चार आठवडे नियमीत घेतल्याने चेहऱ्यावर चमक येते असे म्हटले जाते. चेहऱ्यासोबत शरीराची संपूर्ण त्वचा चमकदार होते. त्यामुळ वधूंनी हा ज्यूस नक्की ट्राय करुन पाहावा..
संबंधित बातम्या