Home Cleaning Tips: पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी, एकदा फरशी पुसताच गायब होतील घरातील झुरळं!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Cleaning Tips: पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी, एकदा फरशी पुसताच गायब होतील घरातील झुरळं!

Home Cleaning Tips: पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी, एकदा फरशी पुसताच गायब होतील घरातील झुरळं!

Published Oct 11, 2024 01:13 PM IST

How To Get Rid Of Cockroach : फरशी पुसण्याच्या पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळा. स्वयंपाकघरातील या सर्व गोष्टी झुरळांना पळवून लावण्यासाठी अतिशय परिणामकारक ठरतात.

कॉकरोच
कॉकरोच (Shutterstock)

Home Cleaning Tips To Get Rid Of Cockroach : दिवाळीचा सण जवळ आला असून. महिनाभर आधीपासूनच घराची साफसफाई करण्याची सुरुवात होते. या स्वच्छता मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि झुरळे बाहेर पडतात. जवळपास प्रत्येक घरात झुरळांची समस्या असते. ही झुरळं घरात घाण आणि बॅक्टेरिया पसरवण्याचं काम करतात. घरात कितीही स्वच्छता केली तरी, कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात झुरळं लपून राहतात. आणि हळूहळू त्यांची संख्या इतकी वाढते की, पुन्हा घरात त्यांचा उपद्रव सुरू होतो. जर झुरळांनी तुमच्या घरातही असाच धुमाकूळ घातला असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्या झुरळांच्या समस्येपासून तुम्हाला मुक्ती देण्याचे काम करतील. यासाठी साफसफाई करताना पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळा आणि त्याने फारशी पुसा.

लवंगाचा करा वापर

घरात साफसफाई करताना पाण्यात अशा काही गोष्टी मिसळू शकता, ज्या झुरळांना अजिबात आवडत नाहीत आणि ते त्यांच्यापासून दूर पळून जातात. यापैकी एक गोष्ट म्हणजे लवंग. यासाठी चार ते पाच लवंग घेऊन ठेचून त्याची पावडर तयार करावी. आता ही पावडर ग्लासभर पाण्यात चांगली उकळून घ्यावी. हे पाणी अर्धे झाले की, लवंगाचा हा अर्क फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळून संपूर्ण घराची लादी पुसून घ्यावी. जर, तुमच्याकडे लवंगाचे तेल असेल, तर तुम्ही त्याचे काही थेंब पाण्यात मिसळून ही उकळू शकता. झुरळे या वासामुळे दूर पाळतात.

Cleaning Tips: किचन मधील या गोष्टी वेळेवर बदलणे आहे गरजेचे, नाहीतर तुम्ही पडाल आजारी

कारल्याचाही होईल उपयोग

कारली पाहिली की लहान मुले जशी दूर पळून जातात, तशीच झुरळे देखील पळून जातात. खरं तर झुरळांना देखील कारल्याचा वास अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही घरात असलेल्या कारल्याची थोडीशी पेस्ट बनवून फरशी पुसण्याच्या पाण्यात मिसळू शकता. अनेकदा कारल्याची भाजी बनवताना आपण त्यांच्या साली फेकून देतो. पण, त्या फेकून देण्याऐवजी त्यांची पेस्ट वापरून तुम्ही झुरळांना पळवून लावू शकता. साफसफाई करताना सर्व कडुलिंबाची पेस्ट पाण्यात मिसळून वापरावी.

पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी 

साफसफाई दरम्यान, आपण फरशी पुसण्याच्या पाण्यात स्वयंपाकघरातील वस्तूंपासून बनवलेले हे मिश्रण देखील घालू शकता. यामुळे घरातील झुरळे नाहीशी होतात. यासाठी एक बादली पाण्यात एक चमचा व्हिनेगर आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. यानंतर त्यात साधारण एक चमचा डिशवॉश लिक्विड घाला. आता या द्रावणाच्या मदतीने तुम्ही घराची चांगली साफसफाई करू शकता. यामुळे झुरळे तर दूर जातीलच, शिवाय तुमची साफसफाईही सोपी होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner