Holi Celebration in Different Places: रंगांचा सण होळी हा आनंदाचा सण आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण या सणाची वाट पाहत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. अनेक ठिकाणी रंगांनी तर काही ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते. तर काठ्या मारून होळी साजरी करण्याचे ठिकाणही आहे. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी होळी कशी साजरी केली जाते ते येथे जाणून घ्या.
उत्तर भारत, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये होळी मोठ्या प्रमाणावर खेळली जाते. होलिका दहनापासूनच लोक रंग खेळायला लागतात. बरसाणाची लठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. होळीच्या दिवशी नांदगावचे हुरियारे आपल्या ढालीसह बरसाणा येथे जातात आणि बरसाणाच्या गोपी काठ्या घेऊन होळी खेळतात.
ही दक्षिणेकडील राज्य आंध्र प्रदेशमध्ये 'मेदुरु होली' म्हणून साजरी केली जाते. या काळात मिरवणुका काढल्या जातात ज्यात लोक उत्साहाने सहभागी होतात. या वेळी पारंपारिक संगीत आणि नृत्यासोबत एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते.
कोकणी आणि कुडूंबी समाज हा सण शांततेत साजरा करतात. या वेळी लोक मंदिरात जातात आणि लोकगीते आणि पाणी, रंगांसह उत्सव साजरा करतात. या रंगांची खास गोष्ट म्हणजे ते हळदीपासून बनवले जातात.
उदयपूरच्या शाही शहरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होलिका दहनाच्या संध्याकाळी, होलिकेच्या पुतळ्याचा नाश केला जातो आणि नंतर शाही बँडसह भव्य घोड्याची मिरवणूक काढली जाते.
दिल्लीची होळी खरोखर पाहण्यासारखी आहे. येथे होळीच्या उत्सवात लोक मोठ्या आवाजात गाण्यांवर नाचतात आणि विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. दिल्लीतही अनेक ठिकाणी होळीच्या पार्ट्या होतात, त्या पाहण्यासारख्या आहेत.
महाराष्ट्रात होळीला होलिका दहन केल्या जाते. या दिवशी वाईट वृत्तींचा त्याग करण्याचे, दहन करण्याचे ते प्रतिक मानले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनला लोक रंग खेळतात. तर काही शहरांमध्ये रंगपंचमीला म्हणजे होळीच्या पाच दिवसांनी रंग खेळला जातो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)