मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Special: होळीच्या प्रत्येक रंगाचा असतो विशेष अर्थ, जाणून घ्या पार्टनरला कोणता रंग लावावा

Holi Special: होळीच्या प्रत्येक रंगाचा असतो विशेष अर्थ, जाणून घ्या पार्टनरला कोणता रंग लावावा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 20, 2024 01:50 PM IST

Holi Colours Meaning: होळीच्या दिवशी रंगांना विशेष महत्त्व आहे. रंगांशिवाय आयुष्याची कल्पना पण करता येत नाही. यंदा होळीला रंग खेळण्यापूर्वी प्रत्येक रंगांचा अर्थ जाणून घ्या.

होळीच्या रंगांचा अर्थ आणि महत्त्व
होळीच्या रंगांचा अर्थ आणि महत्त्व (unsplash)

Significance of Holi Colours: रंगांचा सण असलेली होळी केवळ तुमचा चेहराच नाही तर तुमचे जीवनही रंगबेरंगी आनंदाच्या रंगांनी रंगवतो. या दिवशी रंगांना विशेष महत्त्व असते. रंगांशिवाय जीवन निस्तेज होते. तर रंगांनी हे जग खूप सुंदर दिसते. या होळीला तुम्ही तुमच्या पार्टनर आणि मित्रांसोबत होळी खेळण्याच्या मूडमध्ये असाल तर रंग खरेदी करण्यापूर्वी कोणता रंग कोणासाठी विकत घ्यावा हे जाणून घ्या. प्रत्येक रंगाला एक विशेष अर्थ असतो. पाहा कोणाला कोणता रंग लावावा.

लाल रंग

लाल रंग हे सामान्यतः प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पण होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारा लाल गुलाल जीवनातील उत्साह आणि उर्जेचा संदेश देतो. लहान मुले आणि तरुणांना लाल रंगाचा गुलाल लावू शकता. हा रंग त्यांची ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह दर्शवतो.

पिवळा रंग

पिवळा रंग नेहमीच मैत्री आणि नात्यात गोडवा वाढवण्याचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग आरोग्य, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या रंगाचा मानवी मेंदूवर चांगला परिणाम होतो. असे म्हणतात की ज्या लोकांना पिवळा रंग आवडतो ते खूप सकारात्मक असतात. कोणतीही समस्या आली तरी ते कधीही निराश होत नाही. होळीच्या दिवशी तुम्ही हा रंगाचा गुलाल तुमच्या बहिणी, मैत्रिणी किंवा पार्टनरला लावू शकता.

हिरवा रंग

हिरवा रंग निसर्गाचे सौंदर्य वाढवतो आणि शीतलता, आराम आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. या रंगाचा गुलाल तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्यांना लावू शकता. हा रंग डोळ्यांना रुतत नाही आणि चेहऱ्यावर फुलतो.

केशरी

केशरी रंग आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग केवळ मानसिक शक्ती मजबूत करत नाही तर सामाजिक संबंध मजबूत ठेवण्यास देखील मदत करतो. होळीच्या दिवशी तुम्ही हा रंग तुमच्या मित्रांना, जवळच्या व्यक्तींना आणि कुटुंबियांना लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग