Thandia Powder Recipe: प्रत्येकजण होळीच्या सणाची वाट पाहत असतो. या दिवशी सर्वजण एकत्र येतात आणि रंगांची होळी खेळतात. या उत्सवाची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या दिवशी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमध्ये थंडाईचाही समावेश असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने थंडाई बनवतो. आजकाल चविष्ट थंडाई पिण्यास प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही थंडाईची पारंपारिक रेसिपी फॉलो केली तर ती बनवायला खूप वेळ लागतो. कारण आदल्या रात्री सगळे भिजवावे असते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून घ्या. काही लोक यासाठी पाटा वरवंटा वापरतात. नंतर त्याची पेस्ट थंड दुधात मिसळली जाते. मात्र तुम्हाला होळीच्या दिवशी एवढी मेहनत करायची नसेल, तर होळीपूर्वी थंडाई पावडर तयार करा. ही थंडाई पावडर थंड दुधात मिसळली की तुमची थंडाई तयार होते. जाणून घ्या घरी थंडाई पावडर कशी बनवायची.
- १०० ग्रॅम बदाम
- १०० ग्रॅम काजू
- १०० ग्रॅम पिस्ता
- २ चमचे खसखस
- ४-६ टेबलस्पून खरबूज बिया
- 2 चमचे बडीशेप
- २/४ कप गुलाबाच्या पाकळ्या
- २०-३० वेलची
- ६ चिमूटभर केशर
- २० काळी मिरी
थंडाई पावडर बनवण्यासाठी बदाम, काजू आणि पिस्ता दहा मिनिटे भाजून घ्या. नंतर ते थंड होऊ द्या. आता सर्व काही मिक्सरच्या भांड्यात बारीक पावडर होईपर्यंत बारीक करा. जर तुम्हाला हे मिश्रण गोड करायचे असेल तर सोबत थोडी साखर बारीक करा. काळजी घ्या की हे खूप जास्त बारीक करू नये. जास्त बारीक केल्याने ड्रायफ्रुट्स तेलकट होतील. ते बारीक झाल्यावर प्लेटमध्ये काढा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर एयरटाइट बरणीत टाका आणि हे फ्रिजमध्ये ठेवा.