Tips to Remove Holi Colour: जसजशी होळी जवळ येते तसतसे रंग खेळणे सुरु होते. पण जेव्हा हे रंग त्वचेतून सहजासहजी निघत नाहीत तेव्हा ते वाईट दिसतात. जर तुम्हाला होळीच्या दिवशी रंग खेळायचे असेल तर त्वचेची कोणतीही काळजी न करता खेळा. कारण हे पारंपारिक स्क्रब तुमच्या त्वचेवरील होळीचा रंग काढण्याचे काम करेल. बेसन व्यतिरिक्त नैसर्गिक उटणे कोणत्या गोष्टींमधून बनवता येईल ते जाणून घ्या.
हे नैसर्गिक उटणे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- १ चमचा तांदळाचे पीठ
- १ चमचा लिंबाचा रस
- १ चमचा हळद
- १ चमचा कच्च्या बटाट्याचा रस
तांदळाच्या बारीक पिठात लिंबाचा रस, कच्च्या बटाट्याचा रस, हळद एकत्र करून चांगली पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहरा, मान, हात आणि पाय यांवर जिथे रंग लागला आहे त्या भागांवर लावा. नंतर कोरडे होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होऊ लागते तेव्हा हलक्या हाताने मसाज करा आणि ते काढून टाका. यामुळे शरीरावर जमा झालेला रंग सहज निघतो. रंग निघाल्यानंतर त्वचेवर खोबरेल तेल लावा. यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होईल.
बेसन उपलब्ध नसल्यास गव्हाच्या पिठापासून तयार केलेली पेस्ट देखील रंग प्रभावीपणे काढण्यास मदत करते. एक चमचा गव्हाचे पीठ आणि दही चांगले मिक्स करा. त्यात थोडी हळद मिक्स करा. ही पेस्ट आता शरीरावर आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. जेव्हा हे उटणे सुकायला लागले की हाताने घासून ते काढा. जर उटणे पूर्णपणे सुकले असेल तर पीठ काढण्यासाठी हाताला तेल लावा. हे रंग आणि पीठ दोन्ही सहजपणे काढून टाकेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)