मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Celebration: फक्त भारतच नाही तर या देशातही साजरी केली जाते होळी! जाणून घ्या यादी

Holi Celebration: फक्त भारतच नाही तर या देशातही साजरी केली जाते होळी! जाणून घ्या यादी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 19, 2024 05:11 PM IST

Holi Festival: देशभरात लोक वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की देशाव्यतिरिक्त परदेशातही होळीचा सण साजरा केला जातो, नसेल तर जाणून घ्या.

Travel and Tourism
Travel and Tourism (Pixabay)

Holi 2024: प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. सगळे आपापल्या पद्धतीने याची तयारी करत आहेत. या सणात लोक एकमेकांना गुलाल लावून आनंद साजरा करतात. विशेषतः उत्तर भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी २४ मार्चला होलिका दहनानंतर २५ मार्चला होळीचा सण साजरा केला जात आहे. होळीचा सण देखील विशेष आहे कारण या दिवशी अनेक पदार्थ तयार केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की होळी हा सण फक्त भारतातच नाही तर दुसऱ्या देशातही (Holi celebrated in foreign countries) साजरा केला जातो. आपल्या देशाव्यतिरिक्त कोणत्या देशात होळीचा सण साजरा केला जातो हे जाणून घेऊयात.

नेपाळची होळी

भारताप्रमाणे नेपाळमध्ये सण साजरे केले जातात. नेपाळमध्ये होळीचाही सण साजरा केला जातो. इथेही लोक फुगे पाण्याने भरून एकमेकांवर फेकतात. यासोबतच येथे लोक एकमेकांवर रंग फेकतात. लोकांना रंगांमध्ये बुडविण्यासाठी पाण्याचे मोठे टबही ठेवण्यात आले जातात.

Holi 2024: होळीच्या आसपास जन्मलेल्या बाळांची ठेवा ही रंगीबेरंगी नावे, बघा यादी!

मॉरिशसमध्ये होलिका दहन

मॉरिशसमध्ये फक्त धूलिवंदन आंही तर होलिका दहन साजरा केला जातो. येथे हा शेतीशी संबंधित सण मानला जातो. मॉरिशसमध्ये हा उत्सव बसंत पंचमीपासून सुरू होतो आणि सुमारे ४० दिवस चालतो.

म्यानमारमध्ये होळी

भारताच्या शेजारी देश म्हणजे म्यानमार. तिथेही रंगांचा सण साजरा केला जातो. म्यानमारमध्ये याला मेकाँग आणि थिंगयान म्हणूनही ओळखले जाते. नववर्षानिमित्त हा सण साजरा केला जातो. या दरम्यान लोक एकमेकांवर रंग आणि पाण्याचा वर्षाव करतात.

श्रीलंका

भारताप्रमाणेच श्रीलंकेतही होळी हा सण साजरा केला जातो. इथेही लाल, हिरवा, पिवळा आणि गुलाल रंग असलेल्या लोकांसोबत होळी खेळली जाते. लोक वॉटर गनमधून एकमेकांवर पाणी फेकतात.

Holi 2024: भारतातील ही ठिकाणं आहेत होळी साजरी करण्यासाठी प्रसिद्ध!

इटलीमध्येही केला जातो साजरा होळीचा सण

होय तुम्ही नीट वाचलंत. होळीसारखा सण इटलीमध्येही साजरा केला जातो. याला ऑरेंज बॅटल म्हणतात. मात्र, हा सण जानेवारीत साजरा केला जातो. येथे रंग लावण्याऐवजी लोक एकमेकांवर टोमॅटो फेकतात. स्पेनमध्येही लोक टोमॅटो आणि त्याचा रस एकमेकांवर फेकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग