Thandai Benefits: होळीला आवर्जुन दिली जाते थंडाई, आरोग्यासाठी हे आहेत या समर ड्रिंकचे फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thandai Benefits: होळीला आवर्जुन दिली जाते थंडाई, आरोग्यासाठी हे आहेत या समर ड्रिंकचे फायदे

Thandai Benefits: होळीला आवर्जुन दिली जाते थंडाई, आरोग्यासाठी हे आहेत या समर ड्रिंकचे फायदे

Mar 23, 2024 12:24 PM IST

Holi 204: थंडाई प्यायल्याने शरीर फ्रेश तर होतेच शिवाय व्यक्तीची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. होळी स्पेशल थंडाई पिल्याने आपल्याला कोणते आरोग्य फायदे होतात ते जाणून घेऊया

होळीला थंडाई पिण्याचे आरोग्यदायी फायदे
होळीला थंडाई पिण्याचे आरोग्यदायी फायदे (freepik)

Health Benefits of Thandai: होळीमध्ये थंडाई पिण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. थंडाई आणि रंगांशिवाय होळीच्या सणाची कल्पनाच करता येत नाही. होळीच्या दिवशी सर्व्ह केली जाणारी थेडाई फक्त तुमच्या तोंडाची चव चांगली करत नाही तर ते प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. थंडाई प्यायल्याने शरीर फ्रेश फिल करते, शिवाय व्यक्तीची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. चला जाणून घेऊया होळी स्पेशल थंडाई पिल्याने आपल्याला कोणते आरोग्य फायदे मिळतात.

थंडाई प्यायल्याने होतात हे आरोग्यदायी

स्मरणशक्ती वाढवते

थंडाई बनवताना त्यात अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकले जातात. सुका मेवा स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. थंडाईमध्ये असलेले प्रथिने, ओमेगा ३, जीवनसत्त्वे आणि झिंक सारखी पोषक तत्त्वे स्मरणशक्ती सुधारण्यास देखील मदत करते. थंडाईचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे कार्यही सुधारते.

शरीराचे तापमान नियंत्रित करते

होळीच्या दिवसापासून तापमानही वाढू लागते. अशा परिस्थितीत शरीराला बाहेरील तापमानाशी सुसंगत ठेवण्यासाठी थंडाईचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. थंडाई बनवण्यासाठी बडीशेप आणि वेलची यांसारख्या थंड घटकांचा वापर केला जातो. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने उन्हाळ्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनसारख्या समस्यांपासून सुरक्षित राहता येते.

पचनासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात लोकांना अनेकदा गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंडाईचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. थंडाईमध्ये टाकले जाणारे खसखस, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या आणि सुका मेवा कॅल्शियम, चरबी, प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करून अन्न पचण्यास मदत करतात. थांडईमध्ये असलेल्या बडीशेपमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि कूलिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे गॅस्ट्रिक समस्या दूर होतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

थंडाई बनवताना त्यात टाकल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये भरपूर पोषक असतात. जे शरीराला आवश्यक पोषण देण्यासोबतच आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे प्रदान करते. हेच कारण आहे की थंडाई प्यायल्याने व्यक्तीची प्रतिकारशक्ती सुधारते आणि व्यक्तीला सर्दी आणि ताप यासारख्या विषाणूजन्य संसर्गाचा धोका कमी होतो.

ओव्हरइटिंग टाळता येते

होळीच्या दिवशी गुजिया, मठरी, पापड यासारखे तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. इतकंच नाही तर या गोष्टींच्या अतिसेवनामुळे व्यक्तीला लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्याही होऊ शकतात. अशा परिस्थितीत ड्रिंक म्हणून थंडाईचे सेवन केल्याने व्यक्ती जास्त खाण्यापासून वाचू शकते. वास्तविक थंडाई प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे भूक कमी होते आणि जास्त खाणे टाळले जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner