Ways to Remove Holi Colour: धुलिवंदनच्या दिवशी चेहरा खराब होऊ नये म्हणून सर्व जण रंग खेळण्यासाठी पूर्ण तयारीनिशी बाहेर पडतात. पण अनेकदा सगळी तयारी वाया जाते. रंग खेळताना कोणतीही कसर सोडत नाही. जर तुम्हाला होळीनंतर रंग काढण्याची समस्या येत असेल तर काही टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामुळे तुमचा रंग निघून जाईल आणि तुमच्या त्वचेला इजा देखील होणार नाही. जाणून घ्या या टिप्स
जर तुमच्या अंगावर ओले रंग असतील तर प्रथम ते शक्य तितक्या पाण्याने धुवा. यानंतर आजीने सांगितलेले हे उटणे लावा. हे उटणे बनवण्यासाठी बेसन, हळद, दुधाची साय, खोबरेल तेल आणि लिंबू मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि जिथे रंग आहे त्या भागांवर लावा. फेस पॅकप्रमाणे काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रब करून काढून टाका.
जर तुमच्याकडे ग्लिसरीन असेल तर त्यात गुलाबपाणी मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. काही वेळ तसंच राहू द्या आणि मग कापसाने काढा. यानंतर पाण्याचे झपके मारा.
तुमच्याकडे कोणतेही अँटी-टॅन स्क्रब असल्यास तुम्ही ते रंग काढण्यासाठी वापरू शकता. चेहऱ्यावर स्क्रब लावून दहा मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर सर्कुलर मोशनमध्ये चेहऱ्यावर घासून घ्या. यानंतर चेहरा फेस वॉशने धुवा. रंग काढून टाकल्यानंतर खोबरेल तेल लावा.
रंग खेळून परत आल्यावर चेहऱ्याला काहीही लावू नका. कॉटन बॉलने खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन रंग काढून टाका. यानंतर फेस वॉशऐवजी आंघोळीच्या साबणाने चेहरा धुवा.
लिंबू आणि टोमॅटो देखील ब्लीचसारखे काम करतात. हे चेहऱ्यावर लावल्याने रंग उजळतो. लक्षात ठेवा की रंग काढून टाकण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतर खोबरेल तेल किंवा जे तेल किंवा मॉइश्चरायझर तुम्हाला सूट होते ते लावा. चेहरा व्यवस्थित मॉइश्चरायझ करा.
नखांचा रंग काढण्यासाठी त्यांच्यावर नेल पेंट रिमूव्हर लावा. वाइप्स असलेल्या रिमूव्हरने हात आणि त्वचा कोरडी होणार नाही.
हातावरील रंग काढण्यासाठी कोमट पाण्यात शॅम्पू आणि लिंबू घाला आणि त्यात हात घालून बसा. त्यात बेकिंग सोडाही टाकता येतो. जर रंग खूप दिसत असेल तर काळजी करू नका, तो हळूहळू फिकट होईल. त्वचेचा इजा होणार नाही याची काळजी घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)