Tips to Make Herbal Holi Colours: होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे.या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आपला आनंद साजरा करतात. पण अनेक वेळा बाजारात मिळणारे केमिकलयुक्त रंग आणि पक्के रंग वापरल्याने सणाचा बेरंग होतो. हे रासायनिक रंग आरोग्य आणि त्वचेला हानी पोहोचवतात. सिंथेटिक रंगांनी होळी खेळल्याने त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा, पुरळ, एलर्जी आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते. अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी तुम्ही फुलांच्या मदतीने घरी सहजपणे हर्बल रंग तयार करू शकता. हे रंग केमिकल फ्री असून कोणतेही दुष्परिणाम देत नाहीत. चला तर मग जाणून घ्या कोणत्या फुलापासून कोणता रंग तयार करता येतो.
होळीचा हा लाल रंग प्रेम आणि कोमलतेचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी नैसर्गिक लाल रंगाचा रंग बनवण्यासाठी तुम्ही लाल गुलाबाची पाने, लाल जास्वंद किंवा कोणत्याही लाल रंगाच्या फुलांचा वापर करू शकता. होळीला लाल रंग बनवण्यासाठी लाल जास्वंदाची फुले कुरकुरीत होईपर्यंत वाळवा. यानंतर ही फुले बारीक करून त्याची बारीक पावडर तयार करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लाल चंदनाचाही वापर करू शकता. ओला लाल रंग बनवण्यासाठी तुम्ही डाळिंबाची साले पाण्यात उकळू शकता. किंवा ही फुले बारीक करून पाण्यात भिजवून लाल रंग बनवू शकता.
होळीला पिवळ्या रंगाचा हर्बल कलर तयार करण्यासाठी झेंडू, बहावा किंवा पिवळी शेवंतीची फुले वापरू शकता. या फुलांपासून गुलाल तयार करण्यासाठी त्यांना वाळवावे लागेल. नंतर त्यांचा चुरा करा. ओला पिवळा रंग बनवायचा असेल तर या फुलांची पावडर पाण्यात मिसळून ऑर्गेनिक रंग तयार करू शकता.
होळीसाठी केशरी रंग तयार करण्यासाठी तुम्ही पळसाच्या फुलांची मदत घेऊ शकता. होळीच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी पळसाची सुंदर केशरी फुले फुललेली दिसतात.केशरी रंग बनवण्यासाठी तुमच्याकडे चंदन पावडर आणि पळसाची फुले असणे आवश्यक आहे. दोन्ही समान प्रमाणात बारीक करून तुम्ही हा हर्बल कलर बनवू शकता. याचा ओला रंग बनवण्यासाठी तुम्ही पळसाचे फुले बारीक करून पाण्यात टाकून वापरू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या