मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Hangover: होळी पार्टीचा हँगओव्हर दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Holi Hangover: होळी पार्टीचा हँगओव्हर दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 23, 2024 08:53 PM IST

Holi Party Hangover: जर तुम्हालाही दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी भांग आणि ड्रिंक्समुळे हँगओव्हर होत असेल तर तो दूर करण्यासाठी या टिप्स तुमची मदत करतील.

होळी पार्टीचा हँगओव्हर दूर करण्यासाठी टिप्स
होळी पार्टीचा हँगओव्हर दूर करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Get Rid of Holi Party Hangover: होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी लोकांनी आतापासूनच होळी पार्टीची तयारी सुरू केली असेल. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी भांग आणि ड्रिंक्समुळे तुम्हालाही हँगओव्हर होत असेल आणि त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी डोकेदुखी, ॲसिडीटी, थकवा, उलट्या, अस्वस्थता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर होळीच्या हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी कोणकोणत्या उपायांचा अवलंब करावा हे आधीच जाणून घ्या. या टिप्स तुमचा हँगओव्हर लगेच दूर करतील.

होळी पार्टीच्या हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स पडतील उपयोगी

हायड्रेटेड राहा

अल्कोहोलचे सेवन शरीराला डिहायड्रेट करते. अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची बॉटल सोबत ठेवा आणि दिवसभर वारंवार पाणी प्या.

पुदिना

गरम पाण्यात ५ पुदिन्याची पाने टाकून प्यायल्याने दारूची नशा दूर होण्यास मदत होते. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पोट फुगीच्या समस्येपासून आराम मिळतो आणि आतड्यांना मोठा आराम मिळतो. हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी पुदिना हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय असू शकतो.

ताक आणि काळे मीठ

होळीनंतरच्या हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी ताक आणि काळे मीठ हा एक चांगला पर्याय असू शकतो. एक ग्लास ताकात थोडे काळे मीठ मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात चिमूटभर काळी मिरीही टाकू शकता. हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिवसातून अनेक वेळा याचे सेवन करू शकता.

लिंबू

दारूच्या नशेपासून मुक्त होण्यासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो. होळीच्या हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी लेमन टीचे सुद्धा सेवन केले जाऊ शकते. लेमन टी अल्कोहोलचा नशा लवकर दूर करते आणि त्वरित आराम देते. एक ग्लास थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने नशा लगेच उतरते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग