Hip Fat: हिप्सवरची चरबी वाढून शरीर बेडौल दिसत आहे? मग करा 'हे' उपाय एकदम आकर्षक होईल फिगर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hip Fat: हिप्सवरची चरबी वाढून शरीर बेडौल दिसत आहे? मग करा 'हे' उपाय एकदम आकर्षक होईल फिगर

Hip Fat: हिप्सवरची चरबी वाढून शरीर बेडौल दिसत आहे? मग करा 'हे' उपाय एकदम आकर्षक होईल फिगर

Nov 24, 2024 09:32 AM IST

Tips to reduce waist fat: कंबर आणि नितंबांच्या जवळ लठ्ठपणा वाढल्यामुळे, संपूर्ण शरीराचा आकार खराब दिसतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, हार्मोनल असंतुलन आणि अनुवांशिक कारणांमुळे अनेक वेळा नितंबांवर चरबी जमा होते.

Tips to reduce fat on the buttocks in marathi
Tips to reduce fat on the buttocks in marathi (freepik)

Tips to reduce fat on the buttocks in marathi:  नितंब किंवा हीप्सवर चरबी जमा झाल्यास संपूर्ण शरीराचा आकार कुरूप दिसू लागतो. जसजसे वय वाढत जाते, तसतसे बहुतेक स्त्रिया त्यांच्या नितंबांवर अधिक चरबी जमा करतात. गर्भधारणेनंतर, कंबर आणि नितंबांच्या जवळ लठ्ठपणा वाढल्यामुळे, संपूर्ण शरीराचा आकार खराब दिसतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, हार्मोनल असंतुलन आणि अनुवांशिक कारणांमुळे अनेक वेळा नितंबांवर चरबी जमा होते. नितंब आणि कंबरेवर जमा झालेल्या चरबीमुळे तुमची फिगर खराब दिसू लागली असेल, तर तुम्ही काही उपाय करून हिप्सवरील चरबी कमी करू शकता. चला तर मग याबाबत जाणून घेऊया...

कार्डिओ व्यायाम महत्त्वाचा आहे-

शरीरात जमा होणारी चरबी कमी करण्यासाठी, विशेषतः नितंबांच्या आसपास, यासाठी सर्वात आधी दिवसभर बसून राहण्याची सवय सोडली पाहिजे. स्वतःच व्यायाम करा. कार्डिओसह स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज केल्याने हिप फॅटकमी होऊ शकते. फिटनेस ट्रेनरचा सल्ला घेऊन तुम्ही या व्यायामाचा सराव घरीही करू शकता.

नियमितपणे एरोबिक व्यायाम करा-

एरोबिक्सद्वारे तुम्ही शरीरातील अतिरिक्त चरबी देखील कमी करू शकता. एरोबिक्स व्यायाम विशेषतः कंबरेभोवती लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो. एरोबिक अतिरिक्त चरबी कमी करून नितंबांना टोन करते. एरोबिक्स व्यायामामुळे मांडीची चरबीही कमी होते. तसेच तुम्ही सायकल चालवत जा. दररोज वेगाने चालणे किंवा धावणेसुद्धा यासाठी उत्तम पर्याय आहे.

खोबरेल तेलाने मालिश करा-

खोबरेल तेलाने मसाज केल्याने नितंब, कंबर आणि मांड्यांभोवती जमा झालेली चरबीही कमी होऊ शकते. या तेलातील फॅटी ऍसिड त्वचेद्वारे पेशीच्या पडद्यामध्ये शोषले जात असल्याने, चरबीचे ऊर्जेत रूपांतर होऊ लागते. नारळ तेल देखील चयापचय वाढवते, ज्यामुळे भूक कमी होते. दररोज या तेलाने कंबर आणि नितंबांना मसाज करा.

हिप फॅट कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या-

शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? पाणी पिण्याने यकृताला चरबीचे ऊर्जेत रूपांतर होण्यास मदत होते, ज्यामुळे चयापचय क्रिया गतिमान होते. जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा तुमचे पोटही काही काळ भरलेले असते. असे केल्याने तुम्ही वाढलेले वजन कमी करू शकता.

आहार निरोगी असावा-

तुम्हीही बाहेरचे पदार्थ खात असाल तर आजपासूनच बंद करा. त्याऐवजी शुद्ध आरोग्यदायी घरगुती आहार घ्या. तुमच्या आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा. अशाप्रकारे तुम्ही अवघ्या काही दिवसांत हीप्स आणि कंबरेची चरबी कमी करू शकता.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner