मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hing Benefits : चिमूटभर हिंग करते ‘या’ ५ आजारांशी प्रभावीपणे सामना! तुम्हाला माहीत आहेत का फायदे?

Hing Benefits : चिमूटभर हिंग करते ‘या’ ५ आजारांशी प्रभावीपणे सामना! तुम्हाला माहीत आहेत का फायदे?

Jul 03, 2024 09:30 AM IST

Hing Health Benefits In Marathi: हिंगामध्ये असलेले पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. याच्या सेवनाने अनेक गंभीर आजार दूर होतात आणि जेवणाची चवही वाढते. चला जाणून घेऊया त्याचे फायदे...

चिमुटभर हिंग करेल ‘या’ ५ आजारांशी सामना!
चिमुटभर हिंग करेल ‘या’ ५ आजारांशी सामना!

Hing Health Benefits In Marathi: हिंग हा एक असा मसाला आहे, जो डाळींपासून ते भाज्यांपर्यंत प्रत्येक पदार्थाला जबरदस्त चव देतो. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात या मसाल्याशिवाय कोणतेही अन्न पूर्ण मानले जात नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, हिंग डाळी आणि भाज्यांची चव तर वाढवतोच, पण याचा आरोग्यालाही भरपूर फायदा होतो. हिंगामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक आहेत. त्याच्या वापराने अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते. हिंग, ज्याला इंग्रजीमध्ये ‘Asafoetida’ म्हणून ओळखले जाते, हा एक प्राचीन आयुर्वेदिक मसाला आहे, जो त्याच्या विविध औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हिंगाचे नियमित सेवन केल्यास अनेक आजारांवर मात करता येते. जाणून घेऊया याचे फायदे...

पचन समस्या

हिंग पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हिंगाचे सेवन केल्याने पाचक एंझाइम अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन सुधारते.

Weight Loss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे २-२-२चा फॉर्म्युला! जाणून घ्या नक्की काय करायचं...

अ‍ॅसिडिटी आणि गॅस

ऋतू कोणताही असो, अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या सामान्य आहे. एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने आम्लपित्त आणि गॅसपासून आराम मिळतो.

ट्रेंडिंग न्यूज

सर्दी आणि खोकला

हिंगातील अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सर्दी आणि खोकल्याच्या उपचारात देखील मदत करतात. गरम पाण्यात हिंग मिसळून प्यायल्याने घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

Zika Virus : पुण्यात आढळले झिका व्हायरसचे रुग्ण, जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय

मासिक पाळीच्या वेदना

हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि पेटके दूर करण्यास मदत करतात. कोमट पाण्यात हिंग टाकून सेवन केल्याने मासिक पाळीत येणाऱ्या वेदनांच्या समस्यांपासून आराम मिळतो.

रक्तातील साखर नियंत्रित करते

हिंगाच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. हे शरीरातील इंसुलिनची संवेदनशीलता वाढवते. हे टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

ही खबरदारी घ्या!

हिंग आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. कारण, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गरोदर महिला आणि मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हिंगाचे सेवन करावे. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये चिमूटभर हिंग वापरून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि तुमचे आरोग्य सुधारू शकता. 

Guava Leaves Benefits: मधुमेह असो वा वेट लॉस, फायदेशीर आहे पेरूची पानं, जाणून घ्या फायदे 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel