Why Hindi Day is Celebrated on September 14th: आज देशभरात १४ सप्टेंबर रोजी 'हिंदी दिवस' साजरा केला जात आहे. १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण आजच्याच दिवशी हिंदी दिवस का साजरा केला जातो हे फार कमी लोकांना माहीत आहे. हिंदीला १४ सप्टेंबर १९४९ रोजी अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापासून, भाषेचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना तिचे महत्त्व समजावे यासाठी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. हिंदी राष्ट्रीय भाषा आहे की नाही याबाबत अनेक वादसुद्धा पाहायला मिळतात.
भारत विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे याठिकाणी प्रत्येक भाषेला तितकाच महत्व आणि आदर दिला जातो. त्यामुळेच हिंदी ही केवळ एक भाषा नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. हिंदी दिवसाचे विशेष महत्त्व मुलांना त्यांच्या शालेय दिवसांपासून समजावून सांगितले जाते. हिंदी भाषेचा उगम संस्कृतमधून झाला. त्याची लिपी देवनागरी आहे. हे भारतातील बहुतेक राज्यांमध्ये बोलले जाते. हिंदीचा साहित्यिक इतिहास खूप समृद्ध आहे.
१४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेत हिंदीला देशाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. हा दिवस खास बनवण्यासाठी दरवर्षी या तारखेला हिंदी दिवस साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून १४ सप्टेंबर या दिवस साजरा होतो. परंतु देशभरात विविध भाषा बोलल्या जात असल्याने हिंदी ही राष्ट्र भाषा आहे की नाही याबाबत नेहमीच वादविवाद पाहायला मिळतात. हिंदीला राष्ट्रभाषा मानतात हिंदी राष्ट्र भाषा नसल्याचे म्हणतात. त्यामुळे अतिशय खोलवर अभ्यास करण्यासारखा आहे.
हिंदी भाषेसाठी एक दिवस निश्चित करणे खूप फायदेशीर आहे. हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि लोकांना तिचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. इतर भाषांप्रमाणेच तरुणांमध्ये हिंदीकडेही कल वाढावा यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, कविता वाचन, लेखन, नाटक असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातून प्रत्येकाला हिंदी भाषेचा अभ्यास करता येतो.
जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत हिंदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येते की, इंग्रजी पहिल्या क्रमांकावर आहे आणि मँडरीन चायनीज दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील सुमारे ६०.८८ कोटी लोक हिंदी भाषा त्यांची मातृभाषा म्हणून वापरतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)