Symptoms of Breast Cancer: प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने नुकतीच तिच्या तब्येती बद्दलच्या अफवांवर मौन सोडले आणि पुष्टी केली की तिला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. ही बातमी तिच्या चाहत्यांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये चिंता आणि प्रश्न निर्माण करते. स्तनाचा कर्करोग ही एक गंभीर आरोग्याची स्थिती आहे जी जगभरातील बऱ्याच स्त्रियांना प्रभावित करते. हे कर्करोगाचा एक प्रकार आहे जो स्तनाच्या ऊतींमध्ये उद्भवतो. परंतु रोगाच्या व्याप्तीनुसार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. स्तनाचा कर्करोग लवकर आढळल्यास लहान ऑपरेशन किंवा चिरा देऊन पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीची गरज भासणार नाही. त्यामुळे महिलांच्या समस्याही कमी होतील. स्तनाच्या कर्करोगबद्दल सविस्तर जाणून घेताना आधी त्याची लक्षणे कोणती आहेत ती पाहा.
डब्ल्यूएचओच्या मते, स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. स्तनाचा कर्करोग ही अशी स्थिती आहे जेव्हा विशिष्ट जनुकांमधील बदलांमुळे, स्तनाच्या पेशी विभाजित होतात आणि वाढू लागतात आणि अनियंत्रितपणे पसरतात. कर्करोग हा सहसा स्तनाच्या दुध निर्माण करणाऱ्या ग्रंथी किंवा नलिकांमध्ये होतो, ज्या ग्रंथींमधून स्तनाग्रापर्यंत दूध वाहून नेतात.
सुरुवातीला स्तनाचा कर्करोग लक्षणे नसलेला असू शकतो. ते कळू शकत नाही. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे देखील स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकारावर अवलंबून असतात. तथापि, या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गाठ असते. परंतु हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग नाही. स्तनाच्या कर्करोगाची काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
१. स्तनामध्ये कठीण 'गाठ' जाणवणे. सहसा या गांठीमुळे वेदना होत नाहीत.
२. स्तनाच्या निप्पलमधून खराब रक्त येणे
३. स्तनाच्या आकारात बदल होणे
४. अंडरआर्ममध्ये गाठ किंवा सूज येणे
५. स्तनाग्र किंवा निप्पल लाल होणे
मात्र, ही लक्षणे स्तनाच्या कर्करोगाव्यतिरिक्त इतर आजाराचीही असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक चाचण्या करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या