Problems Caused By Uncontrolled Blood Pressure: तुमचा रक्तदाब हा तुमच्या डॉक्टरांच्या प्रमाणित श्रेणीपेक्षा जास्त असतो का? हल्ली बैठी जीवनशैली, जास्त वजन आणि लठ्ठपणा, तणाव, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, सोडियमयुक्त आहार आणि कौटुंबिक इतिहास यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. दुर्दैवाने, अनियंत्रित रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतात, ज्यामुळे रुग्णांमध्ये मृत्यू आणि विकृतीचे प्रमाण वाढते. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी रक्तदाब अनियंत्रित असेल तर कोणत्या समस्या उद्भवतात याविषयी सांगितले.
मोठ्या संख्येने लोक हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकने ग्रस्त आहेत आणि त्यातील एक म्हणजे उच्च रक्तदाब जो तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर दुष्परिणाम करतो. धमन्यांमध्ये प्लेक विकसित होतात जे त्यांना कठोर, अरुंद किंवा अवरोधित करतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात, जे रक्तप्रवाहातून तुमचे हृदय किंवा मेंदूला होणारा रक्तपुरवठा रोखतात. परिणामी हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताची समस्या उद्भवते.
जेव्हा धमन्या जाड किंवा अरुंद होतात, तेव्हा रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येतात. वाढलेल्या कामाच्या ताणामुळे देखील तुमचे हृदयाकडून शरीरातील अवयवांना रक्त पुरवण्यास अडथळा येऊ शकतो. म्हणून एखाद्याला हार्ट फेल्युअरसारखी समस्या उद्भवू शकते, ज्यासाठी वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
तणावाचे प्रमाण जास्त असेल तर पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो आणि स्त्रियांमध्ये देखील कामवासना कमी होऊ शकते.
हे हृदयाला आवश्यकतेनुसार पुरेशा प्रमाणात रक्त न मिळाल्यास होतो. म्हणून जेव्हा उच्च रक्तदाब असलेले लोक चढणावर चालतात, पायऱ्या चढतात किंवा व्यायाम करतात तेव्हा त्यांना छातीवर दाब येणे, वेदना किंवा एखाद्यास त्वरित उपचारांची आवश्यकता भासू शकते.
मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करतात. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाजवळील रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते आणि एखाद्याला जगण्यासाठी डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते.
धक्कादायक म्हणजे, अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. एखाद्याची कायमस्वरूपी दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करणे आणि निरोगी राहणे गरजेचे आहे.
- संतुलित आहाराचे सेवन करा.
- दररोज व्यायाम करा. योग आणि मेडिटेशन यासारख्या रिलॅक्सिंग तंत्रांचा वापर करून तणावमुक्त राहा.
- वजन नियंत्रित राखा.
- रक्तदाब कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले औषध घ्या.
- तुमच्या रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या