Walnut Benefits: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आहारात समाविष्ट करावे अक्रोड, रोज खाल्ल्याने मिळतात हे फायदे-high blood pressure patients should include walnuts in diet know the health benefits of eating walnut daily ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Walnut Benefits: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आहारात समाविष्ट करावे अक्रोड, रोज खाल्ल्याने मिळतात हे फायदे

Walnut Benefits: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आहारात समाविष्ट करावे अक्रोड, रोज खाल्ल्याने मिळतात हे फायदे

Feb 07, 2024 06:04 PM IST

Benefits of Walnut: अक्रोडमध्ये अनेक पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आरोग्यासाठी वरदान मानले जाणारे अक्रोड खाल्ल्याने शरीराला कोणते आश्चर्यकारक फायदे होतात हे जाणून घ्या.

अक्रोड खाण्याचे फायदे
अक्रोड खाण्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Eating Walnuts Daily: सकाळी रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. पण जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल किंवा तुमच्या वाढत्या वजनामुळे तुम्ही चिंतेत असाल तर तुमच्या आहारात अक्रोडाचा नक्कीच समावेश केला पाहिजे. मेंदूसारखा दिसणारा हा ड्राय फ्रूट म्हणजे अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. अक्रोड हे प्लांट बेस्ड प्रोटीनचे समृद्ध स्रोत मानले जाते. अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, मॅग्नेशियम, अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. आरोग्यासाठी वरदान मानले जाणारे अक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. कोणते ते पाहा.

हे आहेत अक्रोड खाण्याचे मुख्य फायदे (Benefits of Eating Walnut)

हृदयाचे आरोग्य

अक्रोडमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन हृदय रोग्यांसाठी चांगले मानले जाते.

स्मृतिभ्रंश

जर तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तर अक्रोडाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक संशोधक अक्रोड हे मेंदूला तीक्ष्ण करण्याचा एक मार्ग असल्याचे मानतात. अक्रोडमध्ये असलेले पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीफेनॉल्स, व्हिटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि ब्रेन इंफ्लामेशनपासून संरक्षण करून व्यक्तीला स्मृतिभ्रंशापासून दूर ठेवतात.

वजन कमी करणे

अक्रोडमध्ये असलेले फायबर पचन चांगले ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. अक्रोडमध्ये असलेल्या फायबरच्या प्रमाणामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि व्यक्तीला वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

एजिंगची समस्या दूर करते

अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन ई फाइन लाइन्स, सुरकुत्या, त्वचेचा ढिलेपणा यासारख्या वृद्धत्वाच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

 

उच्च रक्तदाब

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात अक्रोडाचा समावेश करणे फायदेशीर ठरते. स्ट्रोक आणि हार्ट अटॅकसाठी उच्च रक्तदाब मुख्यत्वे जबाबदार मानला जातो. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, ज्याचा रक्तदाब कमी होणे आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्याशी संबंध आहे. अक्रोडचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)