मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: या गोष्टी तुमच्या प्रिय व्यक्तींपासूनही लपवावी, होणार नाही नुकसान!

Chanakya Niti: या गोष्टी तुमच्या प्रिय व्यक्तींपासूनही लपवावी, होणार नाही नुकसान!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 11, 2024 09:00 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांचे नाव कोणाला माहिती नाही असे होत नाही. त्यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी चाणक्य नीती लिहिली. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी धर्म, अर्थ आणि कर्तव्य तसेच जीवनातील विविध महत्त्वाच्या धोरणांविषयी सांगितले आहे. ही नीती आजही तरुणांना मार्गदर्शन करत आहे. या ग्रंथाचे पालन करणाऱ्याला जीवनात यश आणि सन्मान मिळवण्यास मदत होते. या पुस्तकात त्यांनी त्या लोकांबद्दलही सांगितले आहे ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुमचे विचार कोणत्या लोकांसोबत शेअर करू नये. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपण इतर कोणाशीही शेअर करू नयेत.

न विश्वसेत्कुमित्रे च मित्रे चापि न विश्वसेत्।

कदाचित्कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत् ।।

या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की कुमित्रावर कधीही विश्वास ठेवू नये. तुम्ही तुमच्या मित्रावर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. त्याला आपली गुपिते सांगू नकात कारण तो रागाच्या भरात तुमची गुपिते सांगू शकतो.

मनसा चिन्तितं कार्यं वाचा नैव प्रकाशयेत्।

मन्त्रेण रक्षयेद् गूढं कार्य चापि नियोजयेत् ।

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाबद्दल कोणालाच सांगू नाकात. हे नेहमी एखाद्या गुप्त मंत्राप्रमाणे संरक्षित केले पाहिजे. तुमच्या कामाबद्दल सगळ्यांचं माहिती असावी असे काही नाही. सगळ्यांना सांगून केलेले काम माणसाला यशस्वी बनवतेच असं नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel