Safety Tips: शॉपिंग मॉल किंवा दुकानात कॅमेरा तर लपवलेला नाही ना? 'या' सोप्या पद्धतीने लावा शोध-hidden cameras tips for identifying cameras in shopping malls changing room ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Safety Tips: शॉपिंग मॉल किंवा दुकानात कॅमेरा तर लपवलेला नाही ना? 'या' सोप्या पद्धतीने लावा शोध

Safety Tips: शॉपिंग मॉल किंवा दुकानात कॅमेरा तर लपवलेला नाही ना? 'या' सोप्या पद्धतीने लावा शोध

Aug 22, 2024 04:04 PM IST

Tips for Identifying Hidden Cameras: अनेक ठिकाणी चेंजिंग रूममध्ये कॅमेरे आढळल्याचे दिसून आले आहे. कधी-कधी चेंजिंग रूममध्ये कपडे बदलताना आपल्या मनात अनेक विचार घोळत असतात.

Tips to identify camera in the changing room
Tips to identify camera in the changing room (pexabay)

Tips to identify camera in the changing room: अलीकडच्या काळात पुरुष असो किंवा महिला कपडे खरेदी करण्यासाठी मॉल्समध्ये जाणे पसंत करतात. तसेच, येथे तुम्ही कपडे खरेदी करण्यापूर्वी ते फिटिंगमध्ये योग्य आहेत का? आपल्याला व्यवस्थित बसतात का? याची खात्री करून घेण्यासाठी मॉल्समधील ट्रायल रुम्स वापरतात. कपडे खरेदी करतानाच फिटिंग चांगल्या प्रकारे तपासून घेतल्याने नंतर अडचण येत नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अशा ठिकाणी अनेक भयानक प्रकार घडलेले ऐकायला मिळतअसतात. अनेक ठिकाणी चेंजिंग रूममध्ये कॅमेरे आढळल्याचे दिसून आले आहे. कधी-कधी चेंजिंग रूममध्ये कपडे बदलताना आपल्या मनात अनेक विचार घोळत असतात. आपल्याला कुणी पाहत तर नाही ना? किंवा लपून कुणी काहीतरी रेकॉर्ड तर करत नाही ना? तुमच्या याच सर्व शंकांचे निरसन आज आम्ही करणार आहोत. तुम्ही वापरत असलेल्या ट्रायल रूममध्ये कॅमेरा आहे की नाही? हे ओळखण्याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चेंजिंग रूममध्ये कॅमेरा आहे का ओळखण्याच्या टिप्स-

१)सर्वप्रथम, ट्रायल रूम किंवा बाथरूममध्ये आरसा तपासा. आरशात लपलेला कॅमेरा तपासण्यासाठी सर्वप्रथम आरशावर ठेवलेले बोट आणि आरशात दिसणारे बोट यामध्ये अंतर असेल तर सर्वकाही ठीक आहे. जर अंतर नसेल तर त्यामध्ये कॅमेरा असू शकतो.

२) यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर कॅमेरा डिटेक्टर ॲप इंस्टॉल करा. हे ॲप्स सहसा तुमच्या फोनचे सेन्सर वापरून प्रकाशाचे प्रतिबिंब आणि इतर सिग्नलवर आधारित लपलेले कॅमेरे शोधण्याचा प्रयत्न करतात. गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर उपलब्ध असलेले उच्च रेट केलेले कॅमेरा डिटेक्टर ॲप्स वापरा. जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर मदत होईल.

३)ट्रायल रूममध्ये जाऊन कपडे बदलण्यापूर्वी तेथील सर्व लाईट्स बंद करा. मग तुम्हाला लाल किंवा हिरवी लाईट दिसते का हे पाहण्यासाठी काळजीपूर्वक आजूबाजूला पहा. वास्तविक, कॅमेऱ्यांमध्ये असे सिग्नल लाईट्स असतात. जर तुम्हाला असा प्रकाश दिसला तर समजून घ्या की तिथे हिडन कॅमेरा आहे.

३)ट्रायल रूममध्ये असलेली लहान लेन्स किंवा काच तपासा. कॅमेरा लेन्स अनेकदा लहान आणि चमकदार असतात आणि जेव्हा त्यांच्यावर प्रकाश पडतो तेव्हा ते चमकू शकतात. फ्लॅशलाइटच्या मदतीने काळे आणि लपलेले भाग तपासा. जर लेन्स असेल तर ते प्रकाश परावर्तित करू शकते. त्यामुळे तुम्हाला सहजपणे कॅमेरा दिसू शकतो.

४)कॅमेरा शोधण्यासाठी रेडिओ सिग्नल किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नल पकडू शकणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरा. कॅमेरा रेडिओ सिग्नल प्रसारित करत असल्यास, हे उपकरण ते कॅप्चर करू शकते. काहीवेळा कॅमेऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक भाग हलवल्यामुळे लहान आवाज किंवा बीप होऊ शकतात. हे आवाज काळजीपूर्वक ऐका.

५)आजकाल असे कॅमेरे सहज उपलब्ध झाले आहेत जे हँगर, बटणे, टोपी, चष्मा, पेन, हुक, शूज, बेल्ट आणि अगदी इलेक्ट्रिक प्लग आणि टेबल क्लॉकमध्ये देखील लपवले जाऊ शकतात. म्हणून, या सर्व गोष्टींकडे एकदा काळजीपूर्वक पाहा. खात्री करून घ्या.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग