Symptoms of PCOS in Teenage Girl: आपल्या जीवनशैलीचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. खाण्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा शरीरावर आणि अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा परिणाम केवळ वाढत्या वयातच होत नाही तर किशोरवयीन मुलांवरही होतो. स्त्रियांना मासिक पाळीची सुरुवात किशोरवयापासूनच होते. या काळात खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची योग्य काळजी घेतली नाही, तर पीसीओएसची (PCOS) समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही महिलांची एक अतिशय सामान्य आरोग्य समस्या आहे, जे कधीही पूर्णपणे बरे होत नाही. पण योग्य जीवनशैली आणि आहाराने ते नियंत्रित आणि व्यवस्थापित केले जाऊ शकते. ज्या तरुण मुलींची मासिक पाळी नुकतीच सुरू झाली आहे, त्यांनी PCOS ची लक्षणे दिसू लागताच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जाणून घ्या कोणते आहेत ही लक्षणे.
PCOS महिलांच्या प्रजनन अवयवांवर परिणाम करते. यामुळे मासिक पाळीचे नियमन करणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स प्रभावित होतात. पीसीओएसमुळे महिलांमध्ये मेल हार्मोन्स प्रोजेस्ट्रॉनचे उत्पादन इस्ट्रोजेनपेक्षा जास्त होते. त्याच वेळी प्रजनन अवयवांमध्ये सिस्ट म्हणजेच गाठी तयार होऊ लागतात.
जर किशोरवयीन मुलीची मासिक पाळी महिनाभरानंतरही येत नसेल तर तिने स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा. कारण अनियमित मासिक पाळी पीसीओएस मुळे असू शकते. म्हणूनच तुमच्या मासिक पाळीचा टाइम नक्की ट्रॅक करा.
मेल हार्मोन्सच्या जास्त उत्पादनामुळे मुलींची त्वचा अधिक तेलकट दिसू लागते. ज्यामुळे एक्ने आणि ब्रेकआउट्स होऊ लागतात.
पीरियड्सच्या वेळी सामान्यपेक्षा जास्त फ्लो असणे हे देखील पीसीओएसचे लक्षण असू शकते.
पीसीओएसमुळे मुलींचे वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे ती लठ्ठपणाची शिकार बनते.
चेहऱ्यावर केस वेगाने वाढत असतील तर ते हार्मोनल असंतुलनाचे लक्षण आहे. पीसीओएसच्या समस्येने तुम्हाला घेरले असल्याचे हे लक्षण आहे.
केस खूप गळत असतील आणि झपाट्याने पातळ होत असतील तर ते मेल हार्मोन एंड्रोजेनिकमुळे होते.
या सर्व लक्षणांमध्ये महिलांना पीसीओएसची समस्या असू शकते. या समस्येमुळे वाढत्या वयासोबत टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि गर्भाशयाचा कर्करोग यांसारख्या आरोग्याशी संबंधित आजारांचा धोका असतो. पीसीओएसमुळे अनेक महिलांना गर्भधारणा होण्यातही अडचणी येतात. म्हणूनच ही लक्षणे दिसल्यावर वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधून निरोगी जीवनशैली, आहार आणि दिनचर्यायाद्वारे पीसीओएस नियंत्रित करणे आवश्यक आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या