Names on 108 Names of Lord Shiva: श्रावण महिना सुरू असून घरात मुलाचा जन्म झाला असेल तर अशा वेळी बहुतांश लोकांना भगवान शंकराचे नाव ठेवणे आवडते. जर तुमच्या घरातही मुलगा जन्माला आला असेल तर शिवाच्या या १०८ नावांपैकी मुलासाठी चांगले नाव निवडा. ही नावे यूनिक तर आहेतच पण हिंदू धर्मासाठीही अतिशय अर्थपूर्ण ठरतील. म्हणून शिवाच्या १०८ नावांपैकी एक नाव निवडा.
भव - भव हे शिवाचे नाव आहे. ज्याचा अर्थ जग म्हणून प्रकट होणे होय.
त्रिलोकेश - त्रिलोकेश म्हणजे तीन लोकांचा स्वामी. भगवान शिवाचे अतिशय सुंदर नाव.
शितीकंठ - शितीकंठवरून तुम्ही फक्त शिती नाव ही ठेवू शकता. शितीकांत किंवा शितीकंठ म्हणजे पांढरा घसा असणारा.
विरुपाक्ष - विरुपाक्ष हे एक अनोखे नाव वाटेल. ज्याचा अर्थ तीन डोळे असणारा असा आहे.
वृषांक - वृषांक म्हणजे बैलाचे चिन्ह असलेला ध्वज धारण केलेला शिव.
सामप्रिय - प्रेम करणारा भगवान
स्वरमयी - भगवान शिव जे सात सुरांमध्ये राहतात.
अनिश्वर - अनिश्वर म्हणजे जो स्वत:चा स्वामी आहे, भगवान शंकराचे नाव आहे.
हवि - हे यज्ञात अर्पण केलेले आहुती रुपी यज्ञाचे साहित्य आहे.
विश्वेश्वर - सर्व जगाचा देव.
वीरभद्र - हे सौम्य म्हणजे शांत पण तरीही शूर असे रूप आहे.
दुर्धुर्ष - कुणालाही न घाबरणारा आणि न दबणारा.
अनघ - अनघ म्हणजे पापरहित
भर्ग - सर्व पापांचा नाश करणारी व्यक्ती.
व्योमकेश - आकाश रुपी केसांचा
चारू विक्रम - तुम्ही हे एक नाव दोन नावात ठेवून शकता.
रुद्र - रुद्र म्हणजे रौद्र, उग्र, भयंकर रूप शंकर