Benefits of Drinking Okra Water: लहान मुले असो वा मोठे भेंडीची भाजी खायला सर्वांना आवडते. लोक वेगवेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी बनवतात. भेंडीची भाजी टेस्टी असण्यासोबतच ती खूप हेल्दी देखील आहे. पण फक्त भेंडीची भाजीच नाही तर त्याचे पाणी देखील खूप फायदेशीर असते असे काही तज्ज्ञ सांगतात. चला तर मग जाणून घ्या भेंडीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, ते कसे बनवावे आणि ते प्यायची योग्य वेळ कोणती आहे.
वजन कमी करण्यासाठी भेंडीचे पाणी पिता येते.भेंडीमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी, सी, फॉलिक ॲसिड, फायबर इत्यादी असतात. हे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत करतात. याशिवाय हे पेय तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करू शकते.
भेंडी हे विरघळणारे आणि अघुलनशील अशा दोन्ही प्रकारच्या फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे अन्नातून कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतात.
भेंडीमध्ये फ्लेव्होनॉइड्स किंवा अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे संयुगे शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या नुकसानाविरूद्ध सक्रियपणे कार्य करतात. ज्यामुळे इम्यून हेल्थला चालना मिळते.
अभ्यासानुसार भेंडीमध्ये असे संयुगे असतात जे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
घरी भेंडीचे पाणी बनवण्यासाठी आधी ताजी भेंडी चिरून घ्या. नंतर ते रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या भिजवलेली भेंडी पिळून घ्या आणि स्लाइम पाण्यात मिसळा.आता हे पाणी प्या.
वजन कमी करण्यासाठी आणि योग्य पचन होण्यासाठी सकाळी किंवा जेवणापूर्वी भेंडीचे पाणी प्या. भेंडीच्या पाण्याचे सेवन कधीही केले जाऊ शकते. हे पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी देखील पिऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)