Kitchen Tips: लहान किचनमुळे भांडी ठेवण्याची होतेय अडचण? 'या' सोप्या टीप्स करा फॉलो
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: लहान किचनमुळे भांडी ठेवण्याची होतेय अडचण? 'या' सोप्या टीप्स करा फॉलो

Kitchen Tips: लहान किचनमुळे भांडी ठेवण्याची होतेय अडचण? 'या' सोप्या टीप्स करा फॉलो

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 23, 2024 04:40 PM IST

Kitchen Tips: छोट्या स्वयंपाकघरातील अर्ध्याहून अधिक भांडी नेहमी बाहेर असतात, ज्यामुळे स्वयंपाकघर अस्ताव्यस्त दिसते. जर तुमच्या स्वयंपाकघराची अवस्थाही अशीच असेल तर या स्मार्ट किचन टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील.

small kitchen storage hacks
small kitchen storage hacks (shutterstock)

Tips to arrange utensils in a small kitchen: स्वयंपाकघर मोठं असो वा छोटं, अस्ताव्यस्त स्वयंपाकघर कुणालाही आवडत नाही. स्वयंपाकघर हे प्रत्येक घरातील महत्त्वाची जागा असते. या जागेमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रेम आणि आरोग्य दिले जाते. हल्ली बहुतेक घरांची स्वयंपाकघरं आकाराने लहान असतात. ज्यामुळे अनेकदा स्वयंपाकघरात लागणारी भांडी ठेवण्यास अडचण येते. परिणामी स्वयंपाक घर हे अस्ताव्यस्त दिसते. अशावेळी नेमकं काय करावा असा प्रश्न पडतो. चला जाणून घेऊया...

छोट्या स्वयंपाकघरात स्त्रीला काम करण्यातच नव्हे तर साफसफाईतही खूप त्रास होतो. जर तुमच्या स्वयंपाकघराची हीच परिस्थिती असेल तर या स्मार्ट किचन टिप्स मुळे तुमचे छोटे स्वयंपाकघर व्यवस्थित लावू शकता. जेणेकरुन तुमचे स्वयंपाक घर सुंदर दिसेल.

ड्रॉवर डिव्हायडर

स्वयंपाकघरातील सर्व भांडी एकाच ठिकाणी ठेवल्यास भांड्यांची चमक कमी होऊ शकते. अशावेळी स्वयंपाकघरात ठेवलेली भांडी व्यवस्थित करण्यासाठी ड्रॉवर डिव्हायडरचा वापर करावा. या ड्रॉवर दुभाजकांची खासियत म्हणजे ते अॅडजस्टेबल असतात, त्यामुळे तुम्ही भांडी व्यवस्थित अॅडजस्ट होतात. तसेच तुम्ही ड्रॉवर उघडल्यावर भांडी व्यवस्थित लावलेली दिसतात. तुम्ही ड्रॉवर डिव्हायडरच्या मदतीने तुमची कटलरी आणि छोटी भांडी सहज ठेवू शकता.

अंडर कॅबिनेट हुक

स्वयंपाक करताना अनेकदा स्वयंपाकघरात पॅन, चमचे अशा गोष्टी वारंवार वापरल्या जातात. या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवल्याने अनेकदा गरजेच्या वेळी सापडत नाहीत. अशा वेळी या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही कॅबिनेटमधील अंडर कॅबिनेट हूकचा वापर करू शकता. अंडर-कॅबिनेट हुक वापरल्याने स्वयंपाकघरातील ड्रॉवर किंवा काउंटरची जागा रिकामी राहते.

एक्स्ट्रा शेल्फ

जर तुमच्या स्वयंपाकघरात भांडी ठेवण्यासाठी कपाट असेल तर तुम्ही त्या कपाटात २-३ अतिरिक्त शेल्फ जोडून तिथे कटलरी आणि क्रॉकरी सेट ठेवू शकता. असे केल्याने स्वयंपाकघर सुंदर तर दिसेलच, शिवाय व्यवस्थित दिसेल.
वाचा : तुमचा मुलगा रोज शाळेतील टिफिन परत आणतोय? भारती सिंहच्या मुलाचे डायट करा फॉलो

ओपन वुडन शेल्फ

आजकाल किचनमध्ये लाकडी शेल्फचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही त्याचाही वापर करु शकता. किचन डेकोरेशनच्या या टिप्स केवळ स्वयंपाकघराच्या भिंती सुंदर बनवत नाहीत तर स्वयंपाकघरातील भांडी ठेवण्यासही मदत करतात. त्यामुळे वर दिलेल्या टिप्सचा तुम्ही स्वयंपाकघर सजवण्यासाठी किंवा नीटनेटके ठेवण्यासाठी योग्य वापर तो करु शकता.

Whats_app_banner