मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Blouse Design: लहान नेक असलेल्या महिलांसाठी बेस्ट आहेत या ब्लाउज डिझाईन, आकर्षक दिसाल

Blouse Design: लहान नेक असलेल्या महिलांसाठी बेस्ट आहेत या ब्लाउज डिझाईन, आकर्षक दिसाल

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 01, 2023 09:57 PM IST

Blouse Pattern: महिलांमध्ये लांब मान खूप सुंदर मानली जाते. पण ज्या महिलांची मान लहान असते त्या कमी आकर्षक नसतात. त्यांना फक्त योग्य स्टाइलने लूक आकर्षक बनवण्याची गरज असते.

ब्लाउज डिझाईन
ब्लाउज डिझाईन

Blouse Design for Short Neck Women: सौंदर्याच्या प्रमाणात बसणे कठीण आहे. बारीक कंबर आणि लांब मान असेल तरच प्रत्येक जण सुंदर आणि आकर्षक दिसू शकतो असे नाही. तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार कपड्यांचे योग्य डिझाइन निवडून तुम्ही सुंदर दिसू शकता. जर लहान मान असलेल्या महिलांना आकर्षक दिसायचे असेल तर ब्लाउजची ही नेकलाइन निवडा. याने तुम्ही सुंदर तर दिसालच तसेच सर्व जण तुमची प्रशंसा करतील.

ट्रेंडिंग न्यूज

व्ही नेकलाइन

डीप व्ही नेकलाइन आजकाल खूप लोकप्रिय आहे. जवळपास सर्वच अभिनेत्री अशा प्रकारची नेकलाइन कॅरी करताना दिसतील. या नेकलाइनचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला स्लिम दिसण्यासोबतच गळ्याचा भागही लांब दिसायला मदत करते. त्यामुळे जर तुमची मान लहान असेल तर तुम्ही स्वतःसाठी या प्रकारची व्ही नेकलाइन निवडू शकता.

स्क्वेअर शेप ब्रालेट डिझाईन

जर मान लहान असेल तर समोरच्या नेकलाइनला नेहमी ब्रॉड ठेवा. त्यामुळे गळ्याभोवती स्पेस दिसेल. स्क्वेअर शेपच्या नेकलाइनसह शॉर्ट ब्लाउज डिझाइन खूपच आकर्षक दिसतील आणि शॉर्ट नेककडे लक्ष दिल्याशिवाय राहणार नाही.

ऑफ शोल्डर नेकलाइन

खांद्यावर हलके पडणारे ब्लाउज डिझाइन तुम्हाला आकर्षक आणि स्टायलिश देखील बनवतील. तसेच यामध्ये तुमची मान लहान दिसणार नाही. कारण यामध्ये तुमच्या खांद्यापासून मानेपर्यंतची स्पेस अधिक दिसते आणि छोटी मान लपते. त्यामुळे या वेडिंग सीझनमध्ये जर तुम्हाला गर्दीत सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर अशा प्रकारचे नेकलाइन ब्लाउज निवडा आणि परफेक्ट लुक मिळवा.

 

स्वीटहार्ट नेकलाइन

स्वीटहार्ट नेकलाइन देखील ब्रॉड डिझाइनची आहे. ते घालून तुम्ही तुमचा शॉर्ट नेक लूक बदलू शकता. हे सिंपल साडीलाही स्टायलिश लुक देण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel