Raw Milk Face Pack: चेहरा उजळवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे उत्तम मानले जाते. चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्च्या दुधाच्या मदतीने तुम्ही विविध प्रकारचे फेस पॅक तयार करू शकता. व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिडने समृद्ध असलेल्या कच्च्या दुधाचा त्वचेला खूप फायदा होतो. चला तर जाणून घ्या कच्च्या दुधापासून फेस पॅक कसा बनवायचा.
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे कच्चे दूध आणि १ चमचा बारीक केलेले ओट्स आवश्यक आहेत. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी या फेस पॅकचा वापर केला जातो. त्याचबरोबर कच्चे दूध त्वचेला मॉइश्चराइझ करते. या दोन्ही गोष्टी मिक्स करून वापरा. गुळगुळीत आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा हा पॅक लावा.
२ चमचे कच्चे दूध आणि २ चमचे काकडीचा रस घेऊन चांगले मिक्स करा. हा पॅक त्वचेला शांत करण्यासाठी आणि जळजळ, सूज कमी करण्यासाठी चांगला आहे. फ्रेश आणि चमकदार त्वचेसाठी हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावा.
हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे कच्चे दूध घेऊन त्यात २ चमचे पिकलेल्या पपईचा पल्प घाला. पपई त्वचेला एक्सफोलिएट आणि चमकदार बनवण्यासाठी उत्तम आहे. आंघोळीपूर्वी हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरा.
हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे कच्चे दूध आणि १ चमचा चंदन पावडर एकत्र मिक्स करा. त्यानंतर चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर कमीत कमी १० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर धुवून घ्या.
कच्चे दूध आणि ताजे एलोवेरा जेल एकत्र करून फेस पॅक तयार करा. समान स्किन टोनला प्रोत्साहन देण्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे. चेहऱ्यावर लावा आणि कमीत कमी १५ ते २० मिनिटे ठेवा. त्वचेवरील जळजळ शांत करण्यासाठी हा फेस पॅक उत्तम आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)