Baby Girl Name: गणेश चतुर्थीच्या दरम्यान मुलीचा जन्म झाला? ठेवा हे सुंदर नाव, बाप्पााशी आहे कनेक्शन-here are latest unique baby girl name inspired by lord ganesha ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Girl Name: गणेश चतुर्थीच्या दरम्यान मुलीचा जन्म झाला? ठेवा हे सुंदर नाव, बाप्पााशी आहे कनेक्शन

Baby Girl Name: गणेश चतुर्थीच्या दरम्यान मुलीचा जन्म झाला? ठेवा हे सुंदर नाव, बाप्पााशी आहे कनेक्शन

Sep 08, 2024 11:08 PM IST

Baby Girl Name in Marathi: गणेश चतुर्थीच्या जवळपास घरात मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही तिला गणपती बाप्पाच्या नावाशी जोडलेली ही लेटेस्ट आणि यूनिक नावे देऊ शकता. ज्याचा अर्थही खूप खास आहे.

Baby Girl Name - गणपती बाप्पाशी संबंधित मुलीसाठी यूनिक नावं
Baby Girl Name - गणपती बाप्पाशी संबंधित मुलीसाठी यूनिक नावं (unsplash)

Unique Baby Girl Name Inspired By Lord Ganesha: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरात लहान राजकुमारी म्हणजेच मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही गणपती बाप्पाशी संबंधित ही सुंदर नावे ठेवू शकते. प्रत्येक नावाचा अर्थ आपल्या मुलीसाठी मीनिंगफूल आणि खूप खास आहे. कारण प्रत्येक नावाचा गणपती बाप्पाशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. त्यामुळे घरात जन्मलेल्या राजकन्येसाठी यापैकी एक नाव निवडा.

आर्विका - आर्विका नावाचा अर्थ यूनिव्हर्सल, शाश्वत असा होतो.

शुभायी - शुभायी या नावाचा संबंध गणपती देवाशी असून त्याचा अर्थ अतिशय शुभ आहे. गणपतीच्या पुत्राचे नाव शुभ मानले जाते.

गानवी - गानवी हे देखील गणपतीशी निगडित एक नाव आहे.

कृतिनी - कृतिनी म्हणजे स्किलफुल. अशी मुलगी जिच्याजवळ योग्यता, क्षमता आहे. त्याचा संबंध गणपतीशी जोडलेला आहे.

चिन्मयी - चिन्मयी हे गणपतीचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलीला चिन्मयी हे नाव देऊ शकता. ज्याचा अर्थ आनंदी असा आहे.

सिद्धिदा - सिद्धिदा म्हणजे यश. या नावाचा संबंध गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी आहे.

इहिका - इहिका या नावाचा अर्थ बलवान असा होतो.

गन्वी - हे नाव गणेशाच्या नावावरून पडले आहे. ज्याचा अर्थ भक्ती असा होतो.

विदमही - हे भगवान गणेशाचे नाव आहे.

निर्विघ्ना - विघ्नहर्ता श्री गणेशाच्या नावावरून मुलीला निर्विघ्ना नाव देऊ शकता.

रिद्धिता - सिद्धी प्रमाणेच रिद्धिता नाव देखील मुलीला देता येते. हे अतिशय यूनिक नाव आहे.

शाश्वता - हे नाव भगवान गणेशाच्या नावावरून इंस्पायर्ड आहे.

अवनीशा - अवनीशा हे भगवान शंकराचे नाव आहे, ज्यावरून अवनीशा हे नाव प्रेरित झाले आहे.

Whats_app_banner