Iron Rich Foods: शरीरात लोहाची कमतरता आहे का? हे ड्राय फ्रूट्स आणि सीड्स खाण्यास सुरुवात करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Iron Rich Foods: शरीरात लोहाची कमतरता आहे का? हे ड्राय फ्रूट्स आणि सीड्स खाण्यास सुरुवात करा

Iron Rich Foods: शरीरात लोहाची कमतरता आहे का? हे ड्राय फ्रूट्स आणि सीड्स खाण्यास सुरुवात करा

May 12, 2024 10:48 PM IST

Iron Rich Foods: शरीरात लोहाच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागल्यास लगेच हे ड्राय फ्रूट्स आणि सीड्स खाण्यास सुरुवात करा. यामुळे शरीराला सर्व आवश्यक खनिजांसह पुरेशा प्रमाणात लोह मिळेल.

लोहाची कमतरता दूर करणारे ड्राय फ्रूट्स आणि सीड्स
लोहाची कमतरता दूर करणारे ड्राय फ्रूट्स आणि सीड्स (freepik)

Iron Rich Dry Fruits and Seeds: शरीरात सतत लोहाच्या कमतरतेमुळे व्यक्ती ॲनिमियाचा शिकार होऊ शकतो. अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. वाढत्या वयाबरोबर लोहाची कमतरता अनेकदा दिसून येते. गर्भधारणेव्यतिरिक्त विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात, स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता उद्भवू लागते. त्यामुळे थकवा, चक्कर येणे, हात-पाय थंड होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत लोह सप्लिमेंट्स घेणे योग्य ठरते. पण जर तुम्ही या सीड्स आणि ड्राय फ्रुट्सचा तुमच्या आहारात समावेश करा. त्यामुळे लोहाची कमतरता दूर होऊ लागते. जाणून घ्या कोणते आहेत आयरन रिच सीड्स आणि ड्राय फ्रूट्स. 

गार्डन क्रेस सीड्स किंवा आळीवचे बीज

गार्डन क्रेस सीड्सला मराठीमध्ये आळीवचे बीज म्हणतात. या बिया आहारात घेतल्यास ते लोहाचे भरपूर स्रोत आहेत. शंभर ग्रॅम आळीवमध्ये १७.२०% लोह असते.

काळे तीळ

कॅल्शियमसोबतच काळ्या तीळात लोहाचे प्रमाणही जास्त असते. अंदाजे १०० ग्रॅम काळ्या तिळात १३.९०% लोह असते.  आहारात घेतल्याने फायदा होतो.

पांढरे तीळ

पांढऱ्या तीळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. तसेच लोहाची पातळी १५.०४ प्रति शंभर ग्रॅम आहे. पांढरे तीळ कोलेस्ट्रॉल आणि लिपिडचे उत्पादन कमी करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. आहारात याचा नियमित समावेश करता येतो.

तपकिरी खारीक

वाळलेल्या तपकिरी खारीक किंवा खजूरमध्ये प्रति शंभर ग्रॅम ४.७९ लोह असते. जे लोहाची कमतरता सहजपणे भरून काढू शकतात.

जर्दाळू

जर्दाळू ड्राय फ्रूट्सप्रमाणे खाल्ल्या जातात. त्यात व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते. तसेच लोहाची पातळी २.५० प्रति शंभर ग्रॅम आहे. ते खाल्ल्याने लोहासोबतच भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner