Health Benefits of Eating Roasted Chana: काळ्या चण्याची उसळ तुम्ही अनेक वेळा खाल्ली असेल. काळे चणे केवळ चवीलाच चांगले नसतात तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. त्याचे आरोग्य फायदे पाहता फिटनेस फ्रीक लोकांना स्नॅक्समध्ये भाजलेले हरभरे म्हणजेच फुटाणे खाणे आवडते. आरोग्य तज्ञ देखील चांगल्या आरोग्यासाठी दररोज सकाळी मूठभर फुटाणे खाण्याचा सल्ला देतात. फुटाणे हे प्रथिने, फायबर, फोलेट, खनिजे आणि फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत आहे. त्यात फॅटचे प्रमाण कमी असल्यामुळे ते ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. फुटाणे खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात ते पाहा.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जातात. कमी जीआय असण्याचा अर्थ असा आहे की त्या विशिष्ट खाद्य पदार्थाचे सेवन केल्याने तुमची ब्लड शुगर लेव्हल इतर पदार्थांप्रमाणे चढ-उतार होणार नाही. हरभऱ्याची जीआय पातळी २८ असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
हरभऱ्यामध्ये फॅट आणि कॅलरी कमी असतात. तसेच प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. फुटाण्यामध्ये तांबे, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम असते. तांबे आणि मॅग्नेशियम जळजळ कमी करतात आणि रक्तवाहिन्यांना आराम देते. मॅंगनीज ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. फुटाण्यामध्ये फॉस्फरस असतो जो रक्तदाब नियंत्रित करतो.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी फुटाण्याचा आहारात समावेश करावा. याचे सेवन केल्याने व्यक्तीला लवकर भूक लागत नाही. यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. ज्यामुळे व्यक्तीला लवकर भूक लागत नाही. यामध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्ही दीर्घ कालावधीसाठी पोट भरलेले राहते. याशिवाय फायबर पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
अभ्यासानुसार फुटाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला शारीरिक क्षमतेच्या विकासामध्ये आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. गुळासोबत फुटाणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. हे प्रथिनांचा एक चांगला स्रोत असल्याने ते तुमच्या फिटनेसमध्ये फायदेशीर मानले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या