Navratri Drink: चैत्र नवरात्रीच्या उपवासात थकवा आणि अशक्तपणा दूर करतील हे ड्रिंक्स, प्यायल्याबरोबर वाटेल फ्रेश
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Drink: चैत्र नवरात्रीच्या उपवासात थकवा आणि अशक्तपणा दूर करतील हे ड्रिंक्स, प्यायल्याबरोबर वाटेल फ्रेश

Navratri Drink: चैत्र नवरात्रीच्या उपवासात थकवा आणि अशक्तपणा दूर करतील हे ड्रिंक्स, प्यायल्याबरोबर वाटेल फ्रेश

Apr 08, 2024 03:03 PM IST

Chaitra Navratri 2024: बहुतेक लोकांना उपवासाच्या वेळी अशक्तपणा जाणवू लागतो. याचे मुख्य कारण डिहायड्रेशन असू शकते. या समस्येचा सामना करण्यासाठी उपवासाच्या वेळी हे ५ ड्रिंक्स प्या.

Navratri Drink: चैत्र नवरात्रीच्या उपवासात थकवा आणि अशक्तपणा दूर करतील हे ड्रिंक्स, प्यायल्याबरोबर वाटेल फ्रेश
Navratri Drink: चैत्र नवरात्रीच्या उपवासात थकवा आणि अशक्तपणा दूर करतील हे ड्रिंक्स, प्यायल्याबरोबर वाटेल फ्रेश (unsplash)

Drinks to Stay Hydrated During Navratri Fasting: नवरात्र वर्षातून दोनदा येते, एक चैत्र नवरात्री आणि दुसरी शारदीय नवरात्री. ९ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या दिवसात लोक दुर्गा देवीची पूजा करतात आणि उपवास करतात. या उपवासात ते फराळ करतात. उपवास दरम्यान बहुतेक लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, जे डिहायड्रेशनमुळे होते. ही समस्या टाळण्यासाठी उपवासात पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासोबत काही पेयांचा समावेश करा. ही ड्रिंक्स प्यायल्यानंतर तुम्हाला लगेच उत्साही वाटू लागेल. ही ५ ड्रिंक्स कोणती आहेत आणि कसे बनवायचे ते जाणून घ्या.

नारळाचे पाणी आणि सब्जा

तुम्ही नारळाचे पाणी आणि सब्जाच्या बिया घालून उत्कृष्ट पेय तयार करू शकता. यासाठी एक चमचा चिया सीड्स काही वेळ भिजत ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात एक नारळाचा तुकडा किंवा ओले खोबरे आणि एक ग्लास नारळ पाणी घाला. त्यात पुदिन्याची पाने सुद्धा टाका. हे चांगले ब्लेंड करा. आणि मग त्यात चिया सीड्स टाकून प्या.

दह्यापासून बनवा ताक

उपवासात ताक सुद्धा पिऊ शकता. यासाठी ब्लेंडरमध् येदोन चमचे दही टाका आणि नंतर त्यात एक ग्लास पाणी घाला. नंतर ते ब्लेंड करा. आता त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पुदिना पावडर आणि थोडेसे मीठ घालून मिक्स करून प्या.

रुह अफजा दूध

एक ग्लास थंड पाणी ब्लेंडरमध्ये टाका आणि नंतर त्यात एक चमचा साखर घालून ब्लेंड करा. एकदा ब्लेंड केल्यावर त्यात काही बर्फाचे तुकडे आणि रुह अफजा घाला. पुन्हा एकदा ब्लेंड करा. एका ग्लासमध्ये काढून प्या.

संत्र्याचा रस

किमान ७ ते ८ संत्री घ्या आणि नंतर सोलून घ्या. नीट सोलून झाल्यावर ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस काढा. ते गाळून घ्या आणि नंतर त्याच्या पप्लचा आनंद घेत प्या.

शिकंजी आहे सर्वोत्तम

तुम्ही एक ग्लास थंडगार शिकंजी प्यायल्याबरोबर तुम्हाला उत्साही वाटू लागेल. त्यासाठी साखर थोड्या पाण्यात विरघळवून घ्या. नंतर त्यात थंड पाणी आणि बर्फ घाला. आता अर्धा लिंबू पिळून घ्या आणि ड्रिंकचा आनंद घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner