मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brain Tumor: वेळीच सावध व्हा! ब्रेन ट्यूमरचे प्रमाण का वाढत आहे? काय आहे कारण वाचा

Brain Tumor: वेळीच सावध व्हा! ब्रेन ट्यूमरचे प्रमाण का वाढत आहे? काय आहे कारण वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 08, 2024 01:28 PM IST

Brain Tumor: आज ८ जून रोजी ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. पण पण ब्रेन ट्यूमर कशामुळे होतो? काय आहेत कारणे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

Brain Tumor: ब्रेन ट्यूमरची लक्षणे
Brain Tumor: ब्रेन ट्यूमरची लक्षणे

आजकाल तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकजण गंभीर आजारांना समोरे जात असतात. त्यामागे बदलती जीवनशैली, खाद्यपदार्थ, व्यायामाचा आभार अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अनेकांना चुकीच्या खाण्याच्या सवयी लागलेल्या असतात. या सगळ्याचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. कधी कधी या सगळ्या सवयींमुळे कर्करोग होणे, क्षयरोग किंवा ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते. आज ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ब्रेन ट्यूमर होण्यामागची कारणे...

ट्रेंडिंग न्यूज

तरुणांना ब्रेन ट्यूमर का होतो?

दिल्लीचे न्यूरोसर्जन डॉ. अमित श्रीवास्तव यांनी यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणांमध्ये ब्रेन ट्युमरचे वाढण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण अनुवंशिकता असते असे सांगितले आहे. तसेच तरुणांमध्ये मेडुलोब्लास्टोमा आणि एपेंडिमोमा हे कर्करोग मोठ्या प्रमाणावर होतात. त्यासोबतच त्यांनी ब्रेनट्यूमर होण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. तरुणांमध्ये आजकाल मोबाईल फोनचा वापर वाढला आहे. या फोनमुळे ट्युमरचा धोका वाढत असतो. फोनच्या संपर्कात आल्याने डोक्यात असलेल्या कवटीचे हाड कमकुवत होते, त्यामुळे फोनच्या रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होतो. हे वेगाने वाढणारे ट्यूमर आहेत. या गाठी अनेकदा मेंदूच्या आणि पाठीच्या कण्यातील इतर भागांमध्ये पसरत असतात.
वाचा: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप, झटपट तयार होते ही रेसिपी

ब्रेन ट्यूमरची लक्षणे कोणती?

ब्रेन ट्यूमरमुळे सकाळी उठल्यावर वारंवार डोकेदुखी होते. तसेच मळमळ होणे, उलट्या होणे, चक्कर येणे ही देखील ब्रेन ट्यूमरची कारणे आहेत. कधीकधी ब्रेन ट्यूमर होण्याआधी मानसिक संतुलन बिघडते. दृष्टी कमी होते. पाठदुखी सुरु होणे, चालताना पाया दुखणे, स्मृतीभ्रंश होणे असे आजार सुरु असतात.
वाचा: कडक उन्हातही हवी का रिफ्रेशिंग स्किन? अशा प्रकारे दिवसभर वापरा गुलाब जल

ब्रेन ट्यूमर झाल्यावर काय करावे?

ब्रेन ट्यूमरची लक्षणे जाणावल्यानंतर तातडीने उपचार घ्यावेत. जेणेकरुन डॉक्टर शस्त्रक्रिया करुन कर्करोगाच्या पेशी नष्ट करतील. त्यासाठी डॉक्टर रेडिएशन शेरपीचा वापर करतात. तातडीने उपचार घेतल्यावर रुग्ण लवकर बरे होतात.
वाचा: तुम्हाला माहीत आहे का वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे साजरा करण्याचा उद्देश? वाचा महत्त्वाच्या गोष्टी

जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचा इतिहास

जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाचा इतिहास २४ वर्षांपासून साजरा केला जात आहे. जेव्हा २००० मध्ये लाइपझिगस्थित एनपीओ डॉयचे हिरनट्यूमरहिल्फ ईव्ही किंवा जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनने हा दिवस पहिल्यांदा साजरा केला. त्यानंतर हा आंतरराष्ट्रीय दिवस जगभरातील ब्रेन ट्युमर रुग्णांना आणि मेंदूच्या या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग