Raksha Bandhan Special: रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज, सेलिब्रेशनचा आनंद होईल डबल-here are best surprise to plan for sisters on raksha bandhan celebration ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raksha Bandhan Special: रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज, सेलिब्रेशनचा आनंद होईल डबल

Raksha Bandhan Special: रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज, सेलिब्रेशनचा आनंद होईल डबल

Aug 19, 2024 12:21 PM IST

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाचा सण संस्मरणीय करायचा असेल तर काहीतरी खास करणं गरजेचं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच कॉमन गिफ्ट्स आणि पैशांऐवजी बहिणीसाठी काही सरप्राईज प्लॅन करा.

 रक्षाबंधनला बहिणीसाठी सरप्राईज प्लॅन
रक्षाबंधनला बहिणीसाठी सरप्राईज प्लॅन (unsplash)

Surprise Plan for Sister: भाऊ-बहिणीचे प्रेमळ नाते साजरा करणारा सण रक्षाबंधन प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधतात, तर भाऊ बहिणीला खास भेटवस्तू देतात. हा प्रसंग आणखी खास करण्यासाठी तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला गिफ्टसोबत एक खास सरप्राईज देऊ शकता. सरप्राईज कोणाला आवडत नाही. अचानक काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद सेलीब्रेशन डबल करतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही वेगळ्या आयडिया घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे रक्षाबंधन संस्मरणीय होईल.

बहिणीसाठी बनवा तिची फेव्हरेट डीश

आपले फेव्हरेट पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या बहिणीसाठी तिची फेव्हरेट डीश स्वतः बनवू शकता. तिची आवडती डिश बनवण्यासाठी तुम्ही घेतलेले मेहनत पाहून तिला खूप आनंद होईल. यासाठी तुम्हाला मास्टर शेफ लेव्हलचे स्वयंपाक करण्याची गरज नाही. इंटरनेटवरून पाहू शकता किंवा घरी आईची मदत घेऊ शकता. तुमच्या प्रयत्नामुळे हे रक्षाबंधन तुमच्या बहिणीसाठी संस्मरणीय होईल.

फन अॅक्टिव्हिटी प्लॅन करा

रक्षाबंधनाचा दिवस अधिक खास करण्यासाठी तुम्ही फन अॅक्टिव्हिटीजचे प्लॅनिंग ही करू शकता. ही छोटी फॅमिली ट्रीप किंवा मूव्ही आउटिंग असू शकते. आपण आपल्या आवडत्या ठिकाणी पिकनिक प्लॅन देखील करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या बहिणीला शॉपिंगला सुद्धा नेऊ शकता. संध्याकाळी मूव्ही नाईट आणि गेम प्लेइंग हे देखील उत्तम पर्याय आहेत. यामुळे तुमची बहीण आनंदी राहील आणि कौटुंबिक बंधही मजबूत होतील.

बहिणीच्या विशलिस्ट मधील खास गोष्ट गिफ्ट करा

आजकाल ऑनलाइन शॉपिंग अॅप्समध्ये प्रत्येकाची विशलिस्ट असते. ही वस्तू त्यांना विकत घ्यायची आहे पण काही कारणास्तव ते सध्या खरेदी करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या बहिणीच्या विशलिस्टमधील वस्तू भेट देऊ शकता, जे तिला नेहमीच घ्यायचे होते. त्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीला आधीच विचारणं उत्तम. तसे तर त्यांच्या बोलण्याचे निरीक्षण करूनही ते शोधता येते.

सेल्फ केअरचे महत्त्व पटवून द्या

दिवसभर कामात व्यस्त असल्याने आजकाल स्वत:ची काळजी घेणे खूप अवघड झाले आहे. रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला सेल्फ केअरचं महत्त्व सांगू शकता. यासाठी तुम्ही स्पा किंवा सलूनमध्ये त्यांच्यासाठी ट्रीटमेंट बुक करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या बहिणीला योगा क्लास किंवा जिम मेंबरशिप देखील गिफ्ट करू शकता. यामुळे त्यांना आपला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि स्वतःची काळजीही घेता येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)