Heart Health Tips: हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात 'हे' काम! जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heart Health Tips: हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात 'हे' काम! जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Heart Health Tips: हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात 'हे' काम! जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Published Oct 07, 2024 09:08 PM IST

Health Tips in Marathi: आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी फक्त उत्तम आहार, व्यायामच पुरेसे नाही तर काही काम असे आहेत जे यात मदत करतात. या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घ्या.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स
हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स

Activities to Keep Heart Healthy: चांगल्या कामांमध्ये गुंतुन राहिल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले राखता येते. जर तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर चांगली कृती करा, इतरांना मदत करा. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी आपल्या चांगल्या कामांचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे स्पष्ट केले.

चांगले काम केल्याने हृदयाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करणे, हसतमुख राहणे, एखाद्याचे कौतुक करणे, गरजूंसाठी आर्थिक मदत करणे आणि समाजासाठी काम करणे किंवा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करणे, झाडे लावणे, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना मदत करणे तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

आपल्या हृदयावर आपल्या कार्याचा प्रभाव कसा होतो?

१. कामात गुंतुन राहिल्याने हृदयाला भावनिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे पोषण मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या सामाजिक मूल्य जपत काम करते तेव्हा त्यांना आनंद आणि समाधानाची उच्च पातळी अनुभवता येते. ज्यामुळे शरीरातील तणावाचे हार्मोन्स कमी होतात आणि रक्तदाब कमी होतो. यामुळे हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा झटका टाळता येतो.

२. जर एखादी व्यक्ती कोणतेही अर्थपूर्ण काम करत असेल, तर तो/ती तणावमुक्त राहू शकतो आणि चिंता आणि नैराश्य कमी करू शकतो, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. संशोधनानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंद आणि समाधान मिळते त्यांना तुलनेने कमी तणावाचा अनुभव असतो आणि याचा थेट परिणाम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर होतो. तणावामुळे अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक निष्क्रियता यासारख्या सवयी लागतात. जेव्हा व्यक्ती त्यांच्या एखाद्या कार्यात स्वतःला गुंतवू ठेवते तेव्हा ती ताणतणावांच्या विरूद्ध आपली लवचिकता वाढविते, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रोलवर नियंत्रण राखता येते. तणाव किंवा चिंताग्रस्त होऊ नये म्हणून एखाद्याने शांत राहणे, मनातील चिंता, विचार यांना दूर करणे गरजेचे आहे.

३. जे लोक अशा अर्थपूर्ण क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असतात त्यांच्यात ऊर्जा आणि आशावाद जास्त असतो, ज्यामुळे धूम्रपान किंवा अति मद्यपानाच्या घटना कमी होतात आणि हृदय निरोगी राहते.

४. आपल्याला आनंद मिळेल अशा कामात स्वतःला गुंतवून ठेवणे हे तुमच्या हृदयासाठी चांगले आहे. संशोधन असे सूचित करते की ज्या व्यक्तींना उद्देशाची तीव्र भावना आहे ते निरोगी जीवनशैली अंगीकारतात, नियमित शारीरिक हालचाली करतात आणि तणाव कमी करतात. एखाद्याने आपल्या दैनंदिन कार्यांचे योग्य नियोजन करणे, आपल्या निरोगी उपक्रमांचा समावेश करणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांसोबत नातेसंबंध मजबूत केल्याने एकटेपणाची भावना दूर होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner