Best Places To Visit In Haridwar: पितृपक्षात अनेक लोक पिंड दानासाठी हरिद्वारला जातात. तसेच काही लोक या काळात परिवारासोबत धार्मिक ट्रिप सुद्धा प्लॅन करतात. हरिद्वारमध्ये गंगा स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणूनच बहुतेक लोक धार्मिक ट्रिपसाठी हरिद्वारला जातात. येथे अनेक मंदिरे आणि आश्रम आहेत, जिथे गेल्याने मनाला शांती मिळते. पण या धार्मिक सहलीतही तुम्ही अनेक ठिकाणी भेट देऊन ही सहल संस्मरणीय बनवू शकता. वास्तविक हरिद्वारला जाणारे लोक ऋषिकेशला नक्कीच जातात. पण ऋषिकेशशिवाय हरिद्वारमध्ये सुद्धा सुंदर लोकेशन्स आहेत, जे एकदा बघायला हवे.
चिल्ला वन्यजीव अभयारण्य हरिद्वारपासून साडे दहा किमी अंतरावर आहे. २५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या या वाइल्ड लाइफ सेंच्युअरीमध्ये अनेक प्राणी पाहण्याची संधी मिळते. तुमच्या हरिद्वारच्या प्रवासात तुम्ही चिल्ला रेंजमध्ये जीप सफारीचा आनंद सहज घेऊ शकता.
बिल्केश्वर महादेव मंदिर हरिद्वार रेल्वे स्टेशनपासून थोड्या अंतरावर बांधले आहे. या मंदिरात भगवान शंकराची सुंदर मूर्ती आहे.
नील धारा पक्षी अभयारण्य हरिद्वारपासून सुमारे साडे तीन किमी अंतरावर आहे. जिथे हिवाळ्यात अनेक पक्षी स्थलांतर करण्यासाठी येतात. हिवाळ्यात गंगेच्या काठावर सायबेरियन क्रेन सहज दिसतात. शिवालिक टेकड्यांचे सुंदर नैसर्गिक दृश्यही येथून पाहता येते. त्यामुळे हरिद्वारला गेलात तर या पक्षी अभयारण्यात जायला विसरू नका.
पौराणिक मान्यतेनुसार भीमने येथे गुडघे टेकले होते. हे ठिकाण हर की पाडीपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे तुम्ही जाऊ शकता.
हरिद्वारपासून काही किलोमीटर अंतरावर कनखल आहे. जिथे सती कुंड बांधले आहे. हे यज्ञकुंड आहे. राजा दक्षने शिवाचा अपमान केल्यावर सतीने या कुंडात उडी मारली असे मानले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या