Hemoglobin levels in men and women: अलीकडे आपण सतत सर्वांकडून हिमोग्लोबिन हा शब्द ऐकतो. बऱ्याच लोकांना हिमोग्लोबिन म्हणजे काय हे माहितीच नाही. हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तामध्ये आढळणारे प्रथिन आहे. जे आपल्या शरीराच्या ऊतींना ऑक्सिजन पोहोचवते. आपल्या शरीराच्या ऊतींमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होण्यासाठी, हिमोग्लोबिनची पातळी सामान्य असावी लागते. त्याचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊन तुमचे आरोग्य बिघडू शकते.
काही वेळा हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्यास ते ॲनिमिया आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळेच आरोग्य चांगले राहण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी वेळोवेळी तपासली पाहिजे. विज्ञानानुसार, स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगवेगळी असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी थोडीशी कमी असते. स्त्री आणि पुरुषांच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नेमकी किती असावी याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉ'जी इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार सांगण्यात येते की, स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी 12 ते 16 mg/dl मानली जाते. महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी पुरुषांपेक्षा कमी असते.
तर या अहवालानुसार, प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन पातळी १४ ते १८ mg/dl दरम्यान सामान्य मानली जाते. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असते.
जेव्हा शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी होते, तेव्हा असे मानले जाते की त्या व्यक्तीला अशक्तपणा येतो. ॲनिमिया म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. जास्त प्रमाणात असलेल्या अशक्तपणामुळे हृदय आणि फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी वेळोवेळी त्यांची रक्त तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून हिमोग्लोबिनची पातळी लक्षात येईल.
जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाली असेल तर, तुम्हाला हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. लोह हा एक असा घटक आहे जो शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यात मदत करतो. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मांस, मासे आणि अंडी सर्वात फायदेशीर मानली जातात. मात्र जे लोक शाकाहारी आहेत ते हिमोग्लोबिनच्या कमतरता दूर करण्यासाठी बीन्स, कडधान्ये, हिरव्या भाज्या, नट्स आणि विविध बियांचे सेवन करू शकतात. या गोष्टींमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे ॲनिमियाचा धोका दूर होतो.