Remedies to increase height in kids: कोणत्याही व्यक्तीच्या उंचीचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम होतो. उंची आपल्या व्यक्तिमत्वात भर घालते. उंचीचा केवळ व्यक्तिमत्वावर परिणाम होत नाही तर आत्मविश्वासही वाढतो. खरं तर, उंची वाढवणे आपल्या हातात नाही कारण एखाद्याची उंची किती असेल हे शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असते. मात्र असे असतानाही पालकांनी लहानपणापासूनच लक्ष दिल्यास काही गोष्टींचा आहारात समावेश करून मुलाची उंची वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बियांबद्दल सांगणार आहोत, जे मुलांची उंची वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.
कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांनी युक्त चिया सीड्स आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. चिया सीड्स मुलांची उंची वाढवण्यासही मदत करतात. लहानपणापासूनच मुलांना वेगवेगळ्या प्रकारे चिया सीड्सचे सेवन करायला लावले तर त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या उंचीवर आणि आरोग्यावर दिसून येतो. हे निरोगी सीड्स खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि त्वचा देखील चमकदार होते.
सोयाबीन आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे हे तुम्ही ऐकले असेलच. यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. यासोबतच उंची वाढवण्यासही मदत होते. मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांनी दिवसातून किमान ४० ग्रॅम सोयाबीनची बियाणे खाणे गरजेचे आहे.
तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते. याशिवाय तिळाचे तेलही अन्नात वापरले जाते. प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व तीळामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीराला मजबूत करतात आणि लाल रक्तपेशी वाढवतात. याशिवाय तिळाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते. तीळाचे नियमित सेवन केल्याने उंचीही वाढते.
भोपळ्याची भाजी सर्वजण खातात. पण भोपळ्याच्या बियांचे फायदे फार कमी लोकांना माहीत आहेत. वास्तविक, भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. जे शरीराच्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय भोपळ्याच्या बिया देखील उंची वाढवण्यास मदत करतात.
फ्लेक्स सीडमध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा ३ ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे आपल्या शरीरासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय वाढत्या वयातील मुलांसाठी फ्लेक्सक्ससीड खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन असो किंवा त्याच्या तेलाने शरीराला मसाज करणे, दोन्ही पद्धती खूप फायदेशीर आहेत. यामुळे हाडे मजबूत होतात आणि मुलांचा शारीरिक विकास वेगाने होतो.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या