How to increase children's height marathi: मुलांची उंची वाढवण्याचे उपाय-मुलांची उंची कशी वाढवायची-आपल्या मुलांची उंची वाढताना पाहून पालकांना खूप आनंद होतो. लहान मुलांचा विकास योग्य प्रकारे झाला तर त्यांची उंचीही वाढते. परंतु, मुलाची उंची आणि वाढदेखील पालकांच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, ज्या कुटुंबात लोक उंच आहेत, त्यांची मुले उंच असण्याची शक्यताही जास्त असते. पण, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांची उंची वाढत नाहीये तर तुम्ही यासाठी घरी काही उपाय करू शकता. तसेच डॉक्टर आणि बालविकास तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.
काही अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की प्रथिने, कॅल्शियम आणि निरोगी फॅट्स व्यतिरिक्त, विविध प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक घटक देखील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे मुलांना पोषक आणि संतुलित आहार द्या. यामुळे तुमच्या बाळाला पुरेसे पोषण मिळेल आणि तुमच्या मुलाचा विकासही वेगाने होईल.
हाडांच्या योग्य विकासासाठी मुलांना भरपूर व्हिटॅमिन डी मिळायला हवे. व्हिटॅमिन डी साठी तुम्ही तुमच्या मुलाला सकाळी उबदार सूर्यप्रकाशात फिरायला सांगायला हवे. मुलाला दररोज किमान 20 मिनिटे उन्हात बसायला किंवा फिरायला घेऊन जा.
मुलांना रोज एक ते दोन ग्लास दूध प्यायला द्या. तसेच त्यांना पनीर, चीज, दही आणि तूप यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खायला द्या. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळतात. यामुळे मुलांची हाडे, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
कॅल्शियममुळे हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात. मुलाच्या शारीरिक विकासात कॅल्शियमची भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांच्या रोजच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. मुलांना दूध, अंडी, मशरूम, दही आणि कडधान्ये खायला द्या.
अगदी लहान मुलांनाही हंगामी आणि ताज्या भाज्या खायला द्या. यामुळे, मुलांना भरपूर आहारातील फायबर आणि पोषक तत्वे मिळतील. त्यामुळे मुलाची उंची वाढण्यास मदत होईल.