मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Snowfall In February: काश्मीर ते शिमला या ठिकाणी होतेय जोरदार बर्फवृष्टी, आवर्जून करा फिरायचा प्लॅन!

Snowfall In February: काश्मीर ते शिमला या ठिकाणी होतेय जोरदार बर्फवृष्टी, आवर्जून करा फिरायचा प्लॅन!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 03, 2024 11:26 PM IST

February Traveling Tips: सध्या काश्मीरपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंतच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. जर तुम्हाला बर्फ पहायचा असेल तर तुम्ही या पर्यटन स्थळांना आवर्जून भेट देण्याचा प्लॅन करू शकता.

Heavy snowfall is happening from Kashmir to Shimla
Heavy snowfall is happening from Kashmir to Shimla (Waseem Andrabi/HT photo)

Winter Travel Tips: अनेकांना बर्फाचा आनंद घेयचा असतो. सध्या थंडीचा सीजन आहे. बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर फेब्रुवारी (February Traveling Tips) महिना सर्वोत्तम आहे. भारतातील अनेक डोंगरावर बर्फवृष्टी उशिरा सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरपासून हिमाचल प्रदेशच्या सिमला आणि मनालीपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होत आहे. उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी टुरिस्ट येत आहेत. जर तुम्हाला हिमवर्षावचा आनंद घेयचा असेल तर तुम्ही पर्वतांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता. बर्फाच्या शुभ्र चादरीने झाकलेले पर्वत आणि झाडे पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. जर तुम्ही हिमवर्षाव पाहिला तर तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्ग दिसेल. फेब्रुवारीमध्ये हिमवर्षाव पाहण्यासाठी या ठिकाणांना भेट देण्याची प्लॅन करूयात.

कुफरी

हिमाचल प्रदेशातील कुफरी हे हिमवर्षाव पाहण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. इथे सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे. शिमल्याजवळील कुफरी, नारकंडा आणि खारापथरसारखे डोंगराळ भाग बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले आहेत. तुम्हीही इथे येऊन बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.

Travel: भारतात या ठिकाणी गेल्यावर तुम्ही अमेरिकेलाही विसराल! कसे पोहोचायचे ते जाणून घ्या

मसुरी आणि धनोल्टी

उत्तराखंडमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. क्वीन ऑफ हिल्स अर्थात मसुरी ते धनोल्टी सगळीकडेच हिमवर्षाव होत आहे. उत्तराखंडच्या नैनितालमध्येही बर्फवृष्टी होत आहे. चक्रता आणि औली येथे अनेक फूट बर्फ साचला आहे. येथील पहिल्या बर्फवृष्टीनंतर पर्यटकांची गर्दी झाली आहे. तुम्हीही इथे भेट देऊ शकता.

Travel Tips: या देशात तुम्ही अवघ्या ४० मिनिटांत फिरू शकता, कुठे आहे हे जाणून घ्या!

गुलमर्ग

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या भरपूर बर्फवृष्टी होत आहे. गुलमर्गमध्येही बर्फवृष्टी होत आहे. इथे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी रांग लागली आहे. पहलगाम, कोकरनाग आणि गुलमराग तसेच काश्मीर खोऱ्यातील उंच भागात जोरदार हिमवृष्टी होत आहे. तुम्ही येथे बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.

Winter Travel Tips: हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे? या हिल स्टेशनला द्या भेट!

नारकंडा

शिमल्यापासून सर्वात जवळचे हिल स्टेशन म्हणजे नारकंडा आहे. सध्या त्या ठिकाणी खूप बर्फवृष्टी होत आहे. नारकंदाच्या डोंगरावर बर्फाची दाट चादर आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही इथे येण्याचा प्लॅन करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel