How to maintain lung health: आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फुफ्फुस निरोगी ठेवणे आवश्यक आहे. विशेषत: आजच्या वातावरणात जेथे प्रदूषण, बैठी जीवनशैली आणि श्वसनाचे आजार अधिक सामान्य होत आहेत. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत साध्या सोप्या व्यायामाचा समावेश केल्याने फुफ्फुसाची क्षमता चांगल्याप्रकारे सुधारू शकते. श्वासोच्छवासाचे कार्य वाढू शकते आणि तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकते. आज आम्ही तुम्हाला पाच अशा सोप्या व्यायामांबद्दल सांगणार आहोत, जे दररोज केल्याने तुमचे फुफ्फुस मजबूत, लवचिक आणि चांगले कार्य करायला लागेल.
या प्रक्रियेत, सर्वप्रथम एक दीर्घ श्वास घ्या. आता हळूहळू तुमचे दोन्ही हात मागे घ्या. आणि ८ ते १० वेळा श्वास घ्या आणि श्वास सोडा, ही क्रिया ५ ते ७ वेळा पुन्हा करा. या आसनामुळे पोट, बरकड्या , फुफ्फुस आणि कमरेला फायदा होतो. रोगप्रतिकारशक्तीही वाढते. थायरॉईडमध्येही फायदा होतो. शिवाय आवाजातही सुधारणा होते.
ही क्रिया करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि नंतर श्वास घेताना डोके वर उचला. जवळपास ८ ते १० सेकंद या स्थितीत श्वास रोखण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत या. या आसनामुळे फुफ्फुसांची काम करण्याची क्षमता वाढते आणि त्याच वेळी कमरेपासून मानेपर्यंतच्या स्नायूंना आराम मिळतो. श्वसनासाठी ही क्रिया फारच उत्तम आहे.
या योगासनात सिंहाप्रमाणे पोझ बनवा. दीर्घ श्वास घ्या आणि जीभ बाहेर काढा. आपले डोळे आणि तोंड पूर्णपणे उघडा आणि आपल्या घशातून सिंहाप्रमाणे गर्जना करण्याचा प्रयत्न करा. नंतर नाकाद्वारे श्वास घ्या. ही प्रक्रिया ८ ते १० वेळा पुन्हा करा. हे आसन केल्याने श्वसनमार्ग शुद्ध होऊन कार्यक्षमता वाढते. आणि फुफ्फस निरोगी राहण्यास मदत होते.
या आसनात दीर्घ श्वास घेत, छाती आणि पोट विस्तृत करा आणि हात वरच्या दिशेने उंचवा आणि नंतर पायांच्या टाचांनादेखील वर उचला. या आसनात श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न करा हे कमीत कमी ५-१० वेळा करा यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. हे आसन फारच उपयुक्त आहे.
या आसनात एका ठिकाणी शांत बसून घ्या. त्यानंतर डोळे बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या, पोट आणि छाती शक्य तितक्या लांब करा, नंतर या नाकपुडीतून हळूहळू श्वास सोडा. ही क्रिया जवळपास १० ते १५ वेळा करा. हे आसनदेखील श्वसनासाठी चांगले आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)