Health Tips: खाण्याच्या या गोष्टी तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवता का? लगेच बदला सवय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: खाण्याच्या या गोष्टी तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवता का? लगेच बदला सवय

Health Tips: खाण्याच्या या गोष्टी तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवता का? लगेच बदला सवय

Jan 15, 2024 10:32 PM IST

Kitchen Tips: अनेक लोक खण्याचे कोणतेही पदार्थ लगेच फ्रिजमध्ये ठेवतात. पण काही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवायचे टाळले पाहिजे.

फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी ठवू नये
फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी ठवू नये (unsplash)

Foods Should Not Refrigerate: दूध, दही, ब्रेडपासून ते मसाल्यापर्यंत सर्व काही फ्रिजमध्ये ठेवले जाते. पण सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे का? नाही, कारण काही वस्तू फ्रीजमधले ठेवणे टाळले पाहिजे. फक्त पदार्थाची शेल्फ लाइफ वाढावी म्हणून पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत याबाबत लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. चला जाणून घेऊया फ्रिजमध्ये कोणते पदार्थ टाळावेत.

सुका मेवा फ्रीजमध्ये ठेवू नका - जेव्हा ड्राय फ्रूट्स काचेच्या डब्यात ठेवतात तेव्हा त्यांचे शेल्फ लाइफ जास्त असते. त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्याने ते अधिक निर्जलित करतात. त्यामुळे सुका मेवा शिळा होऊ लागतो. याशिवाय त्याची चव आणि कुरकुरीतपणाही खराब होऊ शकतो.

मसाले - मसाले फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची शेल्फ लाइफ वाढेल असे नाही. मसाले लाकडी, काचेच्या किंवा स्टीलच्या कंटेनरमध्ये रुम टेम्परेचवर ठेवा, जेणेकरून त्यांचा सुगंध आणि चव वाढवणारे गुणधर्म टिकून राहतील.

केशर - हे कमी तापमानापासून दूर ठेवावे. केशरचे तंतू कोरडे राहतील याची खात्री करा आणि काळजीपूर्वक साठवा.

कॉफी - तिचा सुगंध, चव आणि एकूण गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी रुम टेम्परेचरला हवाबंद डब्यात कॉफी पावडर ठेवा. तिची चव टिकवण्यासाठी आवश्यक तेवढी कॉफी खरेदी करा.

ब्रेड - ब्रेड फ्रिजमध्ये ठेवले तर त्याचा शिळेपणा आणि बुरशी वाढते. ज्यामुळे त्याचे नैसर्गिक शेल्फ लाइफ १- २ दिवसांनी कमी होते.

कांदे - सोललेली किंवा चिरलेले कांदे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. कारण ते बॅक्टेरिया आकर्षित करतात आणि आसपासच्या दुर्गंधी आणि जंतूशोषून घेतात. काही मिनिटांत वापरला नाही तर चिरलेला कांदा फेकून द्या.

 

खडे मसाले - मसाल्यांप्रमाणेच खडा मसाला सुद्धा पारदर्शक कंटेनरमध्ये रुम टेम्परेचरवर ठेवा. जेणेकरून त्यांचा सुगंध आणि औषधी गुणधर्म टिकून राहतील.

तेल - फ्रिजमध्ये तेल ठेवणे टाळा. कारण त्याची चव बदलते. जेव्हा ते गोठते तेव्हा ते वापरणे कठीण होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner