Foods For Deficiency of Vitamin B12: शरीराच्या सर्व आवश्यक पोषणांमध्ये व्हिटॅमिन बी १२ देखील समाविष्ट आहे. हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. त्यामुळे शरीराला त्याची दररोज गरज असते. व्हिटॅमिन बी १२ न्यूरोट्रांसमीटर संश्लेषणाचा एक भाग बनून मूड आणि शरीराच्या कार्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच शरीराची अनेक महत्त्वाची कार्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच लाल रक्तपेशींची निर्मिती, ॲनिमियापासून बचाव आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. इतकेच नाही तर व्हिटॅमिन बी १२ म्हणजेच कोबालामीन मज्जासंस्थेलाही सांभाळते. शरीरात या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. जी व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत वेगळे व्हिटॅमिन्स सप्लिमेंट्स घेण्यासोबत हे पदार्थ खाणे सुरू करा.
हे वेगवेगळ्या वयोगटांवर आणि गरजांवर अवलंबून असते. १८ वर्षांपर्यंतच्या तरुणांना ०.४ मायक्रोग्रॅम ते १.८ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी १२ आवश्यक आहे. तर प्रौढ व्यक्तीला २.४ मायक्रोग्रॅमची आवश्यकता असते. तर गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या मातांना २.८ मायक्रोग्रॅमची गरज असते.
व्हिटॅमिन बी १२चे प्रमाण एनिमल प्रोडक्ट मध्ये जास्त असते. त्यामुळे शाकाहारी आणि वेगन लोकांना व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण करणे कठीण आहे. प्रामुख्याने चिकन, टर्की, ऑइली मासे, खेकडे, अंडी, अंड्यातील पिवळ बलक हे व्हिटॅमिन बी १२ चे समृद्ध स्त्रोत आहेत.
व्हिटॅमिन बी १२ च्या दैनंदिन गरजेपैकी ४६ टक्के व्हिटॅमिन बी १२ एक कप म्हणजे २४० मिली दुधात आढळते. यासोबतच चीजमध्ये देखील व्हिटॅमिन बी १२ असते. २२ ग्रॅम चीज स्लाइसमध्ये २८ टक्के व्हिटॅमिन बी १२ असते. फुल फॅट प्लेन योगर्टमध्ये व्हिटॅमिन बी १२ चांगले असते. ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे, त्यांनी दही खावे.
आजकाल फुल फॅट दूध आणि डेअरी प्रोडक्ट ऐवजी लोक सोया मिल्क, बदाम दूध आणि राइस मिल्क पिण्यास प्राधान्य देतात. बाजारात उपलब्ध असलेले फोर्टिफाइड बदाम दूध आणि सोया मिल्कमध्ये व्हिटॅमिन बी १२ चांगले असते. एक कप (सुमारे २४० मिली) फोर्टिफाइड सोया दूध ८६ टक्के व्हिटॅमिन बी १२ च्या रोजच्या गरजा पुरवते.
जरी एनिमल प्रोडक्टमध्ये व्हिटॅमिन बी १२ जास्त प्रमाणात असते. पण हे खाणाऱ्यांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता नसेलच असे नाही. कारण संशोधनानुसार अंडी आणि मांसातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन बी १२ पेक्षा शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून मिळणारे व्हिटॅमिन बी १२ अधिक लवकर शोषून घेते. त्यामुळे शाकाहारी लोक त्यांच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ पुरेशा प्रमाणात असू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या