When to change your toothbrush: एखादी व्यक्ती तेव्हा सुंदर दिसते तेव्हा तिचे शरीर स्वच्छ आणि निरोगी असते. यामध्ये आपल्याला शरीराच्या प्रत्येक भागाची काळजीपूर्वक स्वछता करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपले आरोग्य उत्तम राहते. आपल्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. आणि आपण समाजात उठून दिसतो. शरीराची स्वच्छता करताना महत्वाची बाब म्हणजे आपल्या तोंडाचे आरोग्य होय.तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी आपले दात ब्रश करणे आवश्यक आहे. पण कधी कधी टूथब्रशमुळे दात खराब होण्याची शक्यता असते. बहुतांश लोक ठराविक वेळेनंतर टूथब्रश बदलण्यास विसरतात. अशात एकच ब्रश अनेक महिने सतत वापरतात. एकच टूथब्रश सलग अनेक महिने वापरल्याने केवळ दातच नाही तर हिरड्या आणि तोंडही खराब होते.
त्यामुळे टूथब्रश किती दिवसांनी बदलायला हवा हे जाणून घेणं गरजेचं आहे. तसेच टूथब्रश स्वच्छ कसा ठेवता येईल. याबाबतही माहिती असायला हवी.रोग प्रतिबंधक आणि रोग नियंत्रण केंद्राच्या मते, आपण आपला टूथब्रश कमीतकमी 3-4 महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे. पण त्याआधीच जर तुमचा टूथब्रश खराब होऊ लागला असेल तर. उदाहरणार्थ, ब्रशचे ब्रिस्टल तुटत आहेत किंवा खूप तिरके झाले आहेत. त्यामुळे ते तातडीने बदलणे आवश्यक असते. जरी तुम्ही टूथब्रश दोन महिने वापरला असला तरी तो खराब होत असेल तर तो बदलणेच योग्य ठरते.
बहुतांश लोक टूथब्रश बदलण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. किंवा अनेकांना माहितीच नाही की एका ठराविक वेळेनंतर टूथब्रश बदलावा लागतो. अनेकजण तर टूथब्रश अगदी खराब झाल्याशिवाय बदलतच नाहीत. मात्र असे करणे अत्यंत चूक आहे. रोग प्रतिबंधक आणि रोग नियंत्रण केंद्राच्या मते, प्रत्येक ३ ते ४ महिन्यांनी आपला टूथब्रश बदलायला हवा. अशाने आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम राहते. दातांना किंवा हिरड्यांना प्रकारची इजा होत नाही. शिवाय तोंडाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो.
तुमच्या टूथब्रशचे ब्रिस्टल तुटू लागले, वळू लागले, बाजूला पडू लागले तर तेव्हा टूथब्रश ताबडतोब बदलून घ्यावा. पण टूथब्रशचे ब्रिस्टल्स एकदम ठीक असतात, परंतु पांढरा किंवा पिवळा थर टूथब्रशच्या तळाशी स्थिरावायला लागतो तेव्हा ब्रश बदलणे गरजेचे असते. किंवा जर तुमचा टूथब्रश जास्त हार्ड असेल आणि तो सतत हिरड्यांना इजा असेल तर तो सोयीस्कर ठरते.जर तुम्ही बराच काळ आजारी असाल आणि आता आजारातून बरे झाला असाल, तर या आजारात वापरलेला टूथब्रश पुन्हा वापरू नका. जेणेकरून पुन्हा संसर्गाचा धोका राहणार नाही.
तीन ते चार महिने सतत वापरतानाही टूथब्रश निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे टूथब्रश स्वच्छ आणि चांगला राहील. टूथब्रशवर जमा झालेले ब्रिस्टल्स काढून टाकण्यासाठी ते उकळत्या पाण्यात सुमारे 5 मिनिटे ठेवून द्यावे. नंतर पाण्यातून काढून ते स्वच्छ कापडाने पुसून ठेवावे. तसेच बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणात टूथब्रश टाकून ५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घ्यावे.
संबंधित बातम्या