Health Tips: महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचे औषधीय गुणधर्म माहितीयेत? 'या' आजारांसाठी आहे अत्यंत फायदेशीर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचे औषधीय गुणधर्म माहितीयेत? 'या' आजारांसाठी आहे अत्यंत फायदेशीर

Health Tips: महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचे औषधीय गुणधर्म माहितीयेत? 'या' आजारांसाठी आहे अत्यंत फायदेशीर

Updated Aug 02, 2024 09:28 AM IST

Benifits Of Bel Patra: शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्राचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही. तर आयुर्वेदानुसार, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीही बेलपत्र अत्यंत फायदेशीर आहे.

Bael Patra Benefits
Bael Patra Benefits

Benifits Of Bel Patra In Marathi: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकराचे भक्त प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध, धतुरा आणि बेलपत्र अर्पण करतात. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि शिवभक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे हे आपल्या सर्वानांच माहिती आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्राचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही. तर आयुर्वेदानुसार, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीही बेलपत्र अत्यंत फायदेशीर आहे.

भगवान शंकराला बेलपत्र प्रिय असल्याने प्रत्येक शिव भक्तालासुद्धा बेलपत्र तितकेच प्रिय आहे. परंतु अनेक लोकांना अद्याप माहिती नाही की, बेलपत्रामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे विविध आजारांवर उपयुक्त ठरतात. तज्ञांच्या माहितीनुसार, बेलपत्रामध्ये कॅल्शियम, फायबर तसेच जीवनसत्त्वे A, C, B1 आणि B6 सारखे पोषक तत्व आढळतात. जे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम देण्यासोबत हृदयाचे आरोग्य आणि यकृत सुधारण्यास मदत करतात. यासोबतच बेलपत्र मधुमेहाच्या रुग्णांसाठीसुद्धा अत्यंत लाभदायक आहे.

आरोग्याच्यादृष्टीने बेलपत्राचे फायदे

बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम-

बेलपत्राचे नियमित सेवन केल्यास त्यामध्ये असलेल्या फायबरमुळे ॲसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय मूळव्याध असलेल्या लोकांसाठी रिकाम्या पोटी बेलपत्र खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर-

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेलपत्र हे वरदानापेक्षा कमी नाही. बेलपत्रामध्ये असलेले फायबर आणि इतर पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रोज सकाळी याचे सेवन करा. याच्या नियमित सेवनाने तुम्हाला शुगर वाढण्याची चिंता राहणार नाही.

तोंड येण्याच्या समस्येवर उपयुक्त

बऱ्याच वेळा हवामानातील उष्णतेमुळे किंवा औषधांमुळे माणसाच्या तोंडात फोड येऊ लागतात. त्या दातांच्यामध्ये चावल्या जाऊन जखमा तयार होतात. अशा वेळी तोंडात अल्सर असल्यास, दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. यासाठी तुम्ही बेल पत्र चावून खाऊ शकता.

पोटाशी संबंधित समस्या 

बेलपत्र पाचन तंत्र मजबूत करून पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे व्यक्तीला पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्ही बेलपात्र नियमितपणे रिकाम्या पोटी खाऊ शकता. हा उपाय करून तुम्ही गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा

जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, तेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडू लागते. अशा परिस्थितीत, बेलपत्राचे सेवन एखाद्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकते. यामुळे व्यक्तीला वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर कोणत्याही आजारांमुळे आजारी पडणे टाळता येते. त्यामुळे दररोज बेलपत्र खाल्ल्यास तुम्हाला वारंवार आजारी पडण्याचा धोका टाळता येतो.

 

Whats_app_banner