Benefits of keeping a lemon near the bed: लिंबू हा प्रत्येकाच्या घरात सहजासहजी आढळणारे फळ आहे. लिंबाचा वापर भोजनाचा आस्वाद वाढवण्यासाठी केला जातो. तसेच नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलवण्यासाठीही लिंबू फारच उपयुक्त आहे. लिंबाचे अनेक औषधीय फायदे आहेत. लिंबाच्या रसात अनेक पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वे असतात. लिंबू हे फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड आणि बीटा-कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे. लिंबू क्लिनिंग एक्सपर्टसुद्धा आहे. तो फ्रीजमधून दुर्गंधी शोषून घेतो. नखे मजबूत करून कोपर आणि टाचांना मऊ आणि स्वच्छ बनवतो. लिंबाचे फायदे सांगावे तितके कमी आहेत. रात्री झोपताना लिंबूच्या फोडींवर मीठ टाकून उशीजवळ ठेवल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. काही तज्ज्ञांनीदेखील याबाबत माहिती दिली आहे.
आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
घराची जबाबदारी, ऑफिसचे काम यामुळे तुम्ही दिवसभर तणावात असता. दिवसभर स्वत:साठी एकदाही दर्जेदार वेळ काढू शकत नाही. या समस्येमुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे भविष्यात अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला चांगली झोप मिळत नाही. अनिद्रतेमुळे अनेक गंभीर आजार जडतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण लिंबाच्या काही फोडी मीठ टाकून किंवा तशाच बेडजवळ ठेवून तीन वेळा दीर्घ श्वास घेतल्यास तुम्हाला सहज झोप येईल. कारण हे लींबू मेंदूला आराम देते. लिंबाचा सुगंध मनाला शांत करेल आणि झोपायला मदत करेल. लिंबूमध्ये असलेले अँटीबैक्टीरियल गुणधर्म मेंदूला शांत करतात आणि झोप येण्यास मदत करतात.
लिंबूमध्ये अनेक औषधीय गुणधर्म आहेत. त्यामुळेच लिंबाचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातो. कारण ते रक्ताभिसरण वाढवते. केमिकल्सशिवाय त्याचे फायदे मिळविण्यासाठी तुम्ही वेळोवेळी त्याचा वास घ्या. कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा तुकडा बेडजवळ ठेवल्यास त्यांना सकाळी ताजेतवाने वाटते. लिंबाच्या सुगंधामुळे तुमचा टॅन दूर होतो. शिवाय रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते.
ज्या ठिकाणी लिंबाचा वास येतो त्या ठिकाणी कोणताही कीटक राहत नाही. त्यामुळेच रात्री झोपण्यापूर्वी लिंबाची एक फोड कापून त्यावर मीठ टाकून बेडजवळ ठेवा आणि लाईट बंद करा. लिंबाचा सुगंध आणि अंधारामुळे डास आणि माशांसारखे कीटक पळून जातील आणि तुम्ही आरामात झोपू शकाल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लिंबूमध्ये लवंगही घालू शकता.
आपल्याला माहिती आहेच, लिंबूला एक शक्तिशाली सुगंध आहे. त्याला नैसर्गिक फ्रेशनर म्हटले जाते. रात्रीच्या वेळी तुम्ही ते तुमच्या उशीजवळ किंवा बेडजवळ जवळ ठेवता तेव्हा तुम्हाला अतिशय फ्रेश आणि सकारात्मक वाटते. हे फळ एक डिटॉक्सिफायर देखील आहे. जे ताजे आणि स्वच्छ वातावरण निर्माण करून हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करते. त्यामुळेच तुमच्या घरातील वातावरण अतिशय फ्रेश बनते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)