आजकाल लहानमुलांपासून ते थोरामोठापर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल दिसतो. त्यामधील अनेकजण हे तासन्-तास इअरफोन लावून गाणी ऐकत असतात किंवा चित्रपट पाहात असतात. कधीकधी अनेकजण आजूबाजूच्या आवाजाकडेही दुर्लक्ष करण्यासाठी इअरफोनचा सतत वापर करत असतात. पण अशा लोकांना कदाचित माहिती नाही की इअरफोनचा सतत वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कानाच्या संसर्गासारखे अनेक नुकसान होऊ शकतात. हे एखाद्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता देखील कमी करू शकते.
लोक प्रवासात गाणी ऐकणे, घरात बसलेले असताना चित्रपट पाहणे किंवा ऑफिसमध्ये फोनवर बोलताना सतत इअरफोनचा वापर करतात. पण सतत इअरफोन वापरल्यामुळे कानाला इजा होते. कान दुखणे, डोकेदुखी किंवा कानाला सुज येणे अशा अनेक समस्या होताना दिसतात. या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर इअरफोनचा जितका कमी वापर करता येईल तितका करावा.
वाचा: बदाम घालून दूध सकाळी प्यावे की रात्री? काय आहेत शरीराला फायदे
जास्त वेळ इअरफोन वापरल्याचा कानावर परिणाम होतो. कानाच्या आतील रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कानाला इजा होऊ शकते. हेडफोन वापरणे, विशेषत: उच्च आवाजात, कानाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.
वाचा: विचार करून मेंदू थकला असेल तर अशा प्रकारे करा त्याला रिलॅक्स, माइंड होईल क्लिअर
इअरफोनचा अती वापर केल्यामुळे मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. इअरफोनचा अतिवापर केल्याने तुमची ऐकण्याची क्षमताही कमी होऊ शकते. या सगळ्या गोष्टीचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
वाचा: शिकंजी बनवण्याची ही पद्धत नवीन आहे, माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केली रेसिपी
जास्त आवाजामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊन कानांच्या नसा कालांतराने खराब होऊ शकतात. त्यामुळे कमीत कमी इअरफोनचा वापर करावा.
तासनतास इअरफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने डोकेदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकते. अनेकांना ही डोकेदुखीची समस्या असते. पण त्यामागचे कारण नक्की कोणते हे शोधणे गरजेचे असते.
वाचा: या कारणांमुळे होतो मूत्राशय कर्करोग, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
इअरफोनच्या जास्त वापरुन कानाला सूज येते. तुमच्या कानात व्यवस्थित बसत नसतील, तर ते जास्त वेळ वापरल्याने कानात दुखणे आणि सूज येऊ शकते.
संबंधित बातम्या