Thyroid home remedies: भारतीय स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नसतात. असाच एक मसाला म्हणजे मेथीदाणे होय. पिवळ्या रंगाचे असणारे हे मेथीचे दाणे आरोग्यासाठी एकच नाही तर अनेक फायदे देतात. यामध्ये फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही मुबलक प्रमाणात आढळतात. जे थायरॉइडपासून ते PCOD आणि PCOS पर्यंतच्या समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवाणीही हेच सांगतात. साक्षी तिच्या एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये मेथीचे पाणी बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगत आहे. मेथीच्या पाण्याने तुम्हाला कोणते आरोग्य फायदे मिळतात हे देखील जाणून घेतले पाहिजे.
पीसीओएस, पीसीओडी, थायरॉईड, मधुमेह आणि पचनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी मेथीचे पाणी तयार करून प्यावे, असे पोषणतज्ञ सांगतात. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिऊ शकता. रात्री एक ग्लास पाण्यात ४ ते ५ ग्रॅम मेथी भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. तुम्हाला हवे असल्यास हे पाणी तुम्ही मेथीसोबत पिऊ शकता किंवा गाळून पिऊ शकता.
विशेष म्हणजे या मेथीच्या पाण्यात लिंबाचा रस घातल्याने पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात आणि दालचिनी पावडर टाकल्याने PCOS मध्ये मदत होते. याशिवाय त्यात हलकी वेलची पूड टाकूनही सेवन करता येते. त्यामुळे पचनाला मदत होते आणि सकाळी ॲसिडिटीची समस्या होत नाही.
मेथीमधील सक्रिय संयुगे सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स आहेत. आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात आहे. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी, हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात.
पोषणतज्ञांनी सांगितलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, मेथीचे पाणी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होऊ शकते. त्याचे अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म जळजळ कमी करतात. याशिवाय मेथीच्या पाण्याचा प्रभाव वजन कमी करण्यातही दिसून येतो.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या