Joint pain Home remedies: सध्या पावसाळा सुरु आहे. आणि बदलत्या हवामानात बहुतेक लोकांना हाडे, स्नायू, गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास होतो. बहुतांश लोकांना इतका त्रास होतो की, त्यांना उभे राहणे, बसणे, चालणे आणि वाकणे यांसारखी दैनंदिन कामे करणेही कठीण होते. या वेदना टाळण्यासाठी, लोक अनेक महागडे औषधोपचार घेतात. मात्र काहीही फरक पडत नाही. त्यामुळे लोक नैसर्गिक उपाय शोधत राहतात. अशा स्थितीत नाभीमध्ये तिळाचे तेल लावल्याने सांधेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.
तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयाबरोबर हाडांची घनता कमी झाल्यामुळे सांधे कमजोर होतात. याशिवाय सांध्यातील वेदना आणि सूज यांसारख्या समस्या शरीराच्या चुकीच्या आसनामुळे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि संधिवात, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी वैद्यकीय स्थितींमुळेदेखील उद्भवतात. सांधेदुखीचा रोजच्या जीवनशैलीवर परिणाम होतो. ज्यामुळे दररोजच्या मूलभूत कामांसाठीही तुम्ही इतरांवर अवलंबून राहता. अशा परिस्थितीत, सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी नाभी थेरपी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे तुम्ही वेदनामुक्त जीवन जगू शकता. पाहूया ही थेरेपी नेमकी कशी असते.
नाभीला तेलाने मसाज करणे ही एक शक्तिशाली जुनी पद्धत आहे. ही उपचार पद्धती शरीराला डिटॉक्स करते आणि अनेक रोग बरे करते. आयुर्वेदानुसार, नाभी शरीराच्या चेतनेचे केंद्र आहे. जिथे भरपूर ऊर्जा साठवली जाते. नाभी शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाशी ७२ हजार नसांद्वारे जोडलेली असते. अशा प्रकारे नाभीला मालिश केल्याने मज्जातंतूंच्या अंतांना उत्तेजित केले जाते. यातून तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतात. मज्जातंतूचे टोक हे पृष्ठभागावर आणि तुमच्या शरीरातील लाखो बिंदू आहेत जे मेंदूला संदेश पाठवतात जेव्हा त्यांना उष्णता, थंडी आणि वेदना यांसारख्या संवेदना जाणवतात.
तिळाला त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे तेलबियांची राणी म्हटले जाते. तिळाच्या तेलाला आयुर्वेदात नेहमीच महत्त्वाचे स्थान आहे. तिळाचे तेल खाण्यासाठी, मालिश करण्यासाठी आणि नाभीवर लावण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाते. शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंटनेसमृद्ध असलेले तिळाचे तेल शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. आणि फ्री रेडिकल्समुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते.
तिळाच्या तेलामध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात. या तेलाने नाभीला मसाज केल्याने सांधे आणि स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. याशिवाय तिळाच्या तेलाच्या वापराने ऑस्टियोआर्थराइटिसमध्ये आराम मिळतो. हे सांध्यांच्या वेदनांचे एक सामान्य कारण आहे. जे जगातील मोठ्या संख्येने लोकसंख्येला प्रभावित करते. याशिवाय नाभीवर तिळाचे तेल लावल्याने शरीरातील वाढलेला वातदोष कमी होतो. यामुळे स्नायू आणि सांधेदुखीशी संबंधित समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तिळाच्या तेलाचे फक्त २-३ थेंब घ्या आणि नाभीवर टाकून हलक्या हाताने मसाज करा. परंतु हे करताना नाभी जास्त जोराने दाबू नये.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)