Health Tips: आईस्क्रीम खाताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: आईस्क्रीम खाताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Health Tips: आईस्क्रीम खाताना लक्षात ठेवा या गोष्टी, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Jun 11, 2024 05:14 PM IST

Healthy Eating Tips: रखरखत्या उन्हाळ्यात थंड आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही. पण आईस्क्रीम खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते.

आईस्क्रीम खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
आईस्क्रीम खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या (unsplash)

Things to Keep in Mind While Eating Ice Cream: लहान मुले असो वा मोठे उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी थंडगार आईस्क्रीमची मदत घेतली जाते. आईस्क्रीम केवळ जिभेला समृद्ध चवच देत नाही तर उष्णतेमध्ये शरीराला थंडपणाची भावना देखील देते. पण तुम्हाला माहित आहे का की आईस्क्रीम खाताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा चांगल्या चवीच्या नादात आपले आरोग्यही धोक्यात येऊ शकते. आईस्क्रीम खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते येथे जाणून घ्या

आईस्क्रीम खाताना लक्षात ठेवा या गोष्टी

१. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अनेकदा खूप तहान लागते. हे घडते कारण आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते ज्यामुळे शरीराला डिहायड्रेट वाटते. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक आईस्क्रीम खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पितात. पण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, गॅस, ॲसिडिटी, पोटदुखी आणि कधी कधी तब्येत बिघडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर साधारण १५ मिनिटांनीच पाणी प्यावे.

२. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच चहा-कॉफी, ग्रीन टी, सूप इत्यादी गरम पेये घेणे टाळावे. असे केल्याने पोटाचे तापमान अचानक बदलते. ज्यामुळे पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

३. जेवण झाल्यावर लगेच आईस्क्रीमचे सेवन करू नये. तज्ज्ञांच्या मते जेवणानंतर थंड आइस्क्रीम खाल्ल्याने पोटाचे तापमान झपाट्याने कमी होते. यामुळे पचनाच्या समस्या आणि पोटदुखीचा सामना करावा लागतो.

४. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हेवी अन्न सुद्धा टाळावे. जास्त मसाले असलेले, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. असे केल्याने पोटदुखी, उलट्या, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर सुमारे ४० मिनिटांनंतरच अशा पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

५. आईस्क्रीम खाताना सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवायला विसरतो ती म्हणजे ते योग्य प्रमाणात खाणे. खरं तर चवीसाठी आपण बऱ्याच वेळा आईस्क्रीम मोठ्या प्रमाणात खातो. जे नंतर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ल्याने दातांमध्ये कॅव्हिटी, लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner