Health Tips: फक्त पपईच नव्हे 'ही' फळेसुद्धा वाढवतात प्लेटलेट्स, जाणून घ्या नावे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: फक्त पपईच नव्हे 'ही' फळेसुद्धा वाढवतात प्लेटलेट्स, जाणून घ्या नावे

Health Tips: फक्त पपईच नव्हे 'ही' फळेसुद्धा वाढवतात प्लेटलेट्स, जाणून घ्या नावे

Nov 10, 2024 04:04 PM IST

symptoms of low platelet count: लोक सामान्यतः पपई किंवा पपईची पाने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानतात. पण केवळ पपईच प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयुक्त नाही, तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन प्लेटलेट्स सुधारण्यासाठी करता येते.

How to increase platelet count
How to increase platelet count (freepik)

How to increase platelet count:  सर्वसाधारणपणे, डेंग्यू रोगात प्लेटलेटची संख्या कमी होते. कारण डेंग्यूचे विषाणू सर्वप्रथम तुमच्या प्लेटलेट्स आणि हाडांवर हल्ला करतात. पण असे आणखीन काही आजार आहेत ज्यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. उदाहरणार्थ, ऑटोम्युनिटी डिसऑर्डर, अस्थिमज्जा रोग, संक्रमण, रक्त गोठण्याची समस्या तसेच ल्युकेमिया, यकृत सिरोसिस, हिपॅटायटीस सी, एचआयव्ही इत्यादी रोगांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात.

तुम्हाला दारू पिण्याची सवय असली तरी तुमच्या प्लेटलेटचे उत्पादन कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, लोक सामान्यतः पपई किंवा पपईची पाने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानतात. पण केवळ पपईच प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयुक्त नाही, तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन प्लेटलेट्स सुधारण्यासाठी करता येते.

प्लेटलेट्स कसे वाढवायचे?

डाळिंब-

डाळिंब हे एक अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध फळ आहे. जे प्लेटलेटची संख्या आणि एकूणच रोगप्रतिकारक कार्य सुधारण्यास मदत करू शकते.

हिरव्या पालेभाज्या-

पालक आणि ब्रोकोली यांसारख्याहिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. जे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते. सॅलड, स्मूदी किंवा शिजवलेल्या अन्नामध्ये त्यांचा वापर केल्याने प्लेटलेटची संख्या सुधारू शकते.

भोपळा-

भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. जे प्लेटलेट्स तयार करण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्यातून तुम्ही सूप किंवा सॅलड बनवू शकता.

बीट-

बीट-मध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेट असते. जे लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार करण्यास मदत करतात. तुम्ही ते सॅलड, स्मूदी किंवा ज्यूसमध्ये घालू शकता.

गाजर-

गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए जास्त असते. जे रोगप्रतिकारक शक्ती आणि प्लेटलेट उत्पादनास मदत करतात. ते कच्चे, उकडलेले किंवा ज्यूसच्या स्वरूपात वापरण्याची शिफारस केली जाते.

गहूचे गवत-

गव्हाच्या गवतामध्ये क्लोरोफिल असते, जे हिमोग्लोबिन आणि प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करते. तुम्ही गव्हाच्या गवताचा रस पिऊ शकता किंवा स्मूदी किंवा शेकमध्ये व्हीट ग्रास पावडर घालू शकता.

लिंबूवर्गीय फळे-

संत्री, लिंबू आणि यांच्यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे प्लेटलेटचे उत्पादन वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

तिळाचे तेल-

तिळाच्या तेलात अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् आणि पोषक घटक असतात जे प्लेटलेटची संख्या वाढविण्यास मदत करतात. स्वयंपाक करताना तिळाचे तेल वापरावे किंवा दररोज एक चमचे घ्यावे असे सुचवले जाते.

आवळा-

भारतीय गुजबेरी म्हणूनही ओळखले जाते. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. जे रोग प्रतिकारशक्तीला समर्थन देते आणि प्लेटलेटची संख्या वाढवते.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner