मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gastrointestinal Problems: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Gastrointestinal Problems: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 13, 2024 04:00 PM IST

Health Care Tips: पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणे खूप सामान्य आहे. पण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. त्याची लक्षणे आणि काय ट्रीटमेंट करावी ते जाणून घ्या.

Gastrointestinal Problems: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
Gastrointestinal Problems: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार (unsplash)

Symptoms of Gastrointestinal Problems: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात. सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, त्यांची लक्षणे आणि उपचार पर्याय समजून घेऊन पचनाच्या आरोग्य चांगले राखता येऊ शकते. वेळीच उपचार, योग्य निदान आणि आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्याने जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते. आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी तुमचे पचन आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे हे विसरु नका. मुंबई येथील मेटाहेल- लॅप्रोस्कोपी आणि बॅरियाट्रिक सर्जरी सेंटर, सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्सच्या सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी याबाबत काय काळजी घ्यावी, त्याची लक्षणे आणि उपचार सांगितले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पारंपारिक भारतीय आहारात मसाले, तेल आणि कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते. हे कधी कधी ॲसिडिटी, गोळा येणे आणि अपचन यांसारख्या पाचन समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. यासाठी मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ आणि अनियमित जेवणाच्या वेळा टाळणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त अस्वच्छ, उघड्यावरचे अन्नपदार्थांचे सेवन टाळा. पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी रोजचा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि त्याची लक्षणे

१. आंबट ढेकर, अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ: यामध्ये छाती किंवा घशात जळजळ होते. काही प्रकरणांमध्ये पोटातून आवाज किंवा दम्यासारखी लक्षणे दिसून येतात.

२. पोटफुगणे, गॅसेस : ही एक अतिशय सामान्य तक्रार आहे आणि त्यामुळे अस्वस्थता, पोट फुगल्यासारखे वाटते.

३. मळमळ, उलट्या आणि अतिसार : संसर्ग किंवा अपचनानंतर हा परिणाम होऊ शकतो आणि बहुतेक वेळा यात लूज मोशन (जुलाब) आणि पोट खराब होते.

४. ओटीपोटात दुखणे: हलक्या वेदनांपासून ते तीव्र वेदना जाणवतात.

५. कोलायटिस आणि अपेंडिसायटिस: कोलन किंवा अपेंडिक्सची जळजळ, वेदना आणि पचनसंस्थेमध्ये अडथळा आणतो.

६. अल्सर-संबंधित समस्या: गॅस्ट्रिक अल्सर आणि पेप्टिक अल्सर ज्यामुळे ॲसिडिटी, ओटीपोटात दुखणे आणि तीव्र अस्वस्थता जाणवते. गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे अल्सरला छिद्र पडू शकतात, ज्यामुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

७. गॅलस्टोन डिसीज: यात पित्ताशयामध्ये खडे तयार होतात, ज्यामुळे वेदना आणि पचन समस्या उद्भवतात.

८. हर्निया: कमकुवत स्नायूंद्वारे अवयवांना फुगवटा, परिणामी अस्वस्थता आणि गुंतागुंत.

९. बद्धकोष्ठता: मल विसर्जनात अडचण, अनेकदा कठीण मल आणि दररोज मलविसर्जन न होणे.

१०. मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला: गुदद्वाराच्या क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या या परिस्थिती आहेत, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचालीदरम्यान वेदना आणि अस्वस्थता जाणवते.

या जठरोगविषयक/पाचन समस्या विविध लक्षणांमधून दिसून येऊ शकतात जसे की सूज येणे, गॅस, ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता. सतत किंवा अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. मूळ कारण ओळखण्यासाठी वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

निदान चाचण्या

डॉक्टर निदानात मदत करण्यासाठी संपूर्ण रक्त गणना, यकृत कार्य चाचणी, मूत्र आणि मल विश्लेषण, पोटाचा अल्ट्रासाऊंड, युजीआय एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी किंवा इतर इमेजिंग स्टडी यासारख्या निदान चाचण्यांची शिफारस करतात. चाचण्यांचे प्रकार रुग्णानुसार बदलू शकतात.

उपचार

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांवर उपचार करण्याचा दृष्टीकोन विशिष्ट स्थितीनुसार बदलतो आणि त्यामध्ये औषधे, आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल आणि कधी कधी शस्त्रक्रियेसारख्या पर्यायाचा समावेश असू शकतो. संतुलित आहार राखणे, हायड्रेटेड राहणे, नियमित शारीरिक हालचाली करणे आणि तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. लक्षणे कायम राहिल्यास उपायांसाठी सोशल मिडीया सारख्या स्राोतांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहिल. योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग