मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Toothbrush Cleaning Tips: घाणेरडा टूथब्रश वाढवू शकतो आरोग्याच्या समस्या, जाणून घ्या साफ करणे का महत्त्वाचे

Toothbrush Cleaning Tips: घाणेरडा टूथब्रश वाढवू शकतो आरोग्याच्या समस्या, जाणून घ्या साफ करणे का महत्त्वाचे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 11, 2024 11:30 PM IST

Health Tips: प्रत्येक जण आपल्या आयुष्यात टूथब्रश वापरतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की घाणेरडा टूथब्रश तुमचे आरोग्य खराब करू शकतो? जाणून घ्या टूथब्रश का आणि कसा स्वच्छ करावा.

Toothbrush Cleaning Tips: घाणेरडा टूथब्रश वाढवू शकतो आरोग्याच्या समस्या, जाणून घ्या साफ करणे का महत्त्वाचे
Toothbrush Cleaning Tips: घाणेरडा टूथब्रश वाढवू शकतो आरोग्याच्या समस्या, जाणून घ्या साफ करणे का महत्त्वाचे (freepik)

Tips to Clean Toothbrush: दात स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज दात घासण्याची शिफारस केली जाते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घालण्याचा सल्ला तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. दररोज ब्रश केल्याने तोंडाचे आरोग्य चांगले राहते. हे जीवाणू आणि प्लेक काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होतात. पण तुम्हाला माहित आहे का की घाणेरडा टूथब्रश तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो? होय, जर तुमचा टूथब्रश घाणेरडा असेल तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आपण आपला टूथब्रश का स्वच्छ करावा आणि तो कसा स्वच्छ करावा हे येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

टूथब्रश स्वच्छ करणे महत्त्वाचे का आहे?

तोंडात अनेक प्रकारचे जंतू आणि बॅक्टेरिया वाढतात. जेव्हा तुम्ही दात आणि जीभ घासता तेव्हा तुमच्या टूथब्रशवर बॅक्टेरिया, लाळ, टूथपेस्ट, अन्नाचे कण आणि रक्त हे टूथब्रशवर राहते. अशा परिस्थितीत टूथब्रश फक्त पाण्याने धुणे पुरेसे नाही. अहवालात असे म्हटले आहे की टूथब्रशवर अनेक लहान जीवाणू असू शकतात. ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात.

टूथब्रश कसा स्वच्छ करावा

टूथब्रश आणि ब्रिस्टल्स थंड नाही तर गरम पाण्याखाली ठेवा आणि साफ करा. तसेच उकळत्या पाण्यात ३० सेकंद बुडवून ठेवा. मात्र, त्याचे प्लास्टिक वितळणार नाही याची काळजी घ्या.

तुमचा टूथब्रश कसा स्वच्छ ठेवावा

तुम्ही तुमचा टूथब्रश ३० सेकंदांसाठी अँटीबॅक्टेरियल माउथवॉशमध्ये फिरवून स्वच्छ करू शकता. जर तुमच्याकडे माउथवॉश नसेल तर त्याऐवजी १ कप पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा मिसळून वापरा. तुम्ही तुमचा टूथब्रश आठवड्यातून एकदा व्हिनेगरमध्ये भिजवून स्वच्छ करू शकता. काही लोकांना असे वाटते की टूथब्रश शक्यतो टॉयलेटपासून दूर ठेवावे आणि कव्हर करून ठेवावे.

कधी साफ करावे टूथब्रश

टूथब्रश आठवड्यातून एकदा तरी अँटी बॅक्टेरियल कापडाने वापरावा आणि ब्रश किमान दर ३-४ महिन्यांनी बदलावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel